औरंगाबाद जिल्हा परिषदेत राडा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

औरंगाबाद - आज बुधवारी (ता. 3) बारा साडेबाराच्या सुमारास दहा ते पंधरा जणांच्या टोळक्‍याने जिल्हा परिषद परिसरात शिक्षण विभागाकडे घोषणाबाजी करत कार्यालये बंद करण्यास सुरवात केली. शिक्षण सभापती, महिला बालकल्याण विभाग समिती अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत कार्यालये बंद करण्याचे सांगितले. त्यानंतर लेखा व वित्त विभागाकडे जाऊन गोंधळ घातला. त्यात कॅबीन, खुर्च्या, बाकांची तोडफोड करण्यात आली. नंतर सामान्य प्रशासन विभागाकडे जाऊन दमदाटीने कामकाज बंद केले. त्यानंतर बाहेर पोलिसांच्या गाडीचा सायरन्सचा आवाज आल्याने त्या घोळक्‍याने तेथून धूम ठोकली.

औरंगाबाद - आज बुधवारी (ता. 3) बारा साडेबाराच्या सुमारास दहा ते पंधरा जणांच्या टोळक्‍याने जिल्हा परिषद परिसरात शिक्षण विभागाकडे घोषणाबाजी करत कार्यालये बंद करण्यास सुरवात केली. शिक्षण सभापती, महिला बालकल्याण विभाग समिती अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत कार्यालये बंद करण्याचे सांगितले. त्यानंतर लेखा व वित्त विभागाकडे जाऊन गोंधळ घातला. त्यात कॅबीन, खुर्च्या, बाकांची तोडफोड करण्यात आली. नंतर सामान्य प्रशासन विभागाकडे जाऊन दमदाटीने कामकाज बंद केले. त्यानंतर बाहेर पोलिसांच्या गाडीचा सायरन्सचा आवाज आल्याने त्या घोळक्‍याने तेथून धूम ठोकली. विशेष म्हणजे अशावेळी जिल्हापरिषद खातेप्रमुखांनी मुख्यालयात असणे आवश्‍यक होते. परंतू एकही प्रमुख अधिकारी कार्यालयात उपस्थित नव्हता. त्यामुळे तेथील कर्मचारी संघटनेने यावर नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: Marathi News koregaon bhima Aurangabad zilha parishad