कर्करोगावर पंचगव्य रामबाण उपाय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जानेवारी 2018

लातूर - कर्करोगाविषयी वैद्यकीय क्षेत्रातूनच भीती दाखविली जात आहे. लाखो रुपये खर्च करूनही रुग्ण हाती लागण्याची शक्‍यता कमी आहे. पण देशी गायीच्या दूध, तूप, ताक, गोमूत्र व शेणापासून तयार करण्यात आलेल्या पंचगव्यापासून पैसे खर्च न करता कर्करोगावर नियंत्रण मिळवता येते, असा ठाम विश्वास व्यक्त करीत पंचगव्यामुळे अनेक कर्करोगाचे रुग्ण बरे होत आहेत, अशी माहिती टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे सहायक शास्त्रज्ञ डॉ. नवनाथ दुधाळ यांनी येथे दिली.

लातूर - कर्करोगाविषयी वैद्यकीय क्षेत्रातूनच भीती दाखविली जात आहे. लाखो रुपये खर्च करूनही रुग्ण हाती लागण्याची शक्‍यता कमी आहे. पण देशी गायीच्या दूध, तूप, ताक, गोमूत्र व शेणापासून तयार करण्यात आलेल्या पंचगव्यापासून पैसे खर्च न करता कर्करोगावर नियंत्रण मिळवता येते, असा ठाम विश्वास व्यक्त करीत पंचगव्यामुळे अनेक कर्करोगाचे रुग्ण बरे होत आहेत, अशी माहिती टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे सहायक शास्त्रज्ञ डॉ. नवनाथ दुधाळ यांनी येथे दिली.

येथील सेवाधर्म प्रतिष्ठानच्या वतीने सोमवारी (ता. २९) डॉ. दुधाळ यांच्या ‘पंचगव्य’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नॅचरल शुगरचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, ‘एमबीएफ’चे प्रमुख नीलेश ठक्कर, अरुण शाळू महाराज, प्रतिष्ठानचे प्रमुख संजय देशपांडे उपस्थित होते. 

भारतात आरोग्य क्रांती घडवायची असेल तर पंचगव्याशिवाय पर्याय नाही. आज प्रत्येकाच्या शरीरात कॅन्सरच्या पेशी आहेत. रासायनिक खतापासून तयार होणारे धान्य खाल्याने त्याची वाढ होत आहे. शरीरातील एखादा घटक वाढला की या पेशी वाढतात. कॅन्सरच्या रुग्णावर ऑपरेशन, केमो, रेडिएशन अशा तीन उपचारपद्धती केल्या जात आहेत. तरी रुग्ण बरा होत नाही. वर्षाला ३५ लाख लोक कर्करोगाने मृत्यू मुखी पडत आहेत. टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये रोज नवीन एक हजार कॅन्सर रुग्णांची ओपीडी आहे. लाखो रुपये खर्च करूनही हा रोग बरा होत नाही, असे डॉ. दुधाळ म्हणाले. 

गायीवर विश्वास ठेवून उपचार घेण्याची गरज आहे. देशी गायीच्या (जर्शी नव्हे) गोमूत्रात १८ घटक आहेत. त्यात कर्कोमीन नावाचा घटक कॅन्सरवर नियंत्रण ठेवतो. देशी काळ्या गायीचे गोमूत्र कॅन्सर रुग्णासाठी अधिक चांगले आहे. पंचगव्याचा वापर करून कोणताही कॅन्सर नियंत्रित करता येतो. इतकेच नव्हे तर मधुमेह, फिट्‌स, रक्तदाब, ह्रदयरोग, सोरायसीस सारखे त्वचारोग बरे करता येत आहेत. अनेक रुग्ण आज या पंचगव्याचा वापर करून बरे होत आहेत, असे डॉ. दुधाळ म्हणाले. या वेळी श्री. ठोंबरे, श्री. कव्हेकर, श्री. ठक्कर, श्री. शाळू महाराज यांचे भाषण झाले. श्री. देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर डॉ. दुधाळ यांनी अनेक रुग्णांवर नाडी परीक्षण करून उपचार केले.

गायीत दडले अर्थशास्त्र
देशी गायीमध्ये भारताचे अर्थशास्त्र दडले आहे. भाकड देशी गायसुद्धा महिन्याला साठ हजार रुपयांचे उत्पन्न देऊ शकते. गायीच्या दूध, तूप, ताक, गोमूत्र व शेणापासून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. भारतीयांनी पंचगव्याचे सेवन केले तर ते आरोग्यमुक्त तर होतीलच पण पाच वर्षांत एक रुपया एक डॉलरबरोबर जाईल, असा विश्वास डॉ. दुधाळ यांनी व्यक्त केला.

Web Title: marathi news latur marathwada news cancer solution