महापालिकेचे १२ कोटींचे शिलकी अंदाजपत्रक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

लातूर - लातूर शहर महानगरपालिकेचे २०१७ - १८ चे सुधारित तसेच २०१८-१९ चे १२ कोटी ५ लाख रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक महानगरपालिकेचे आयुक्त अच्युत हांगे यांनी शुक्रवारी (ता. १६) स्थायी समितीच्या सभेत सादर केले. या अंदाजपत्रकावर आता स्थायी समितीचे सभापती व सदस्य अभ्यास करून त्यात काही सुधारणा सुचविणार आहेत. पुढच्या महिन्यात ते सर्वसाधारण सभेसमोर सादर होणार आहे.

लातूर - लातूर शहर महानगरपालिकेचे २०१७ - १८ चे सुधारित तसेच २०१८-१९ चे १२ कोटी ५ लाख रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक महानगरपालिकेचे आयुक्त अच्युत हांगे यांनी शुक्रवारी (ता. १६) स्थायी समितीच्या सभेत सादर केले. या अंदाजपत्रकावर आता स्थायी समितीचे सभापती व सदस्य अभ्यास करून त्यात काही सुधारणा सुचविणार आहेत. पुढच्या महिन्यात ते सर्वसाधारण सभेसमोर सादर होणार आहे.

लातूर शहर महानगरपालिकेच्या स्थायी समितीची विशेष सभा शुक्रवारी (ता. १६) स्थायी समितीचे सभापती अशोक गोविंदपूरकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यात हे अंदाजपत्रक सादर झाले. या अंदाजपत्रकात अमृत योजनेअंतर्गत मलनिस्सारण प्रकल्पासाठी १३९ कोटी ४२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रमाई आवास (घरकुल) योजनेअंतर्गत २०१२-१३ ते सन २०१७-१८ पर्यंत १ हजार ४६४ घरकुलांना मंजुरी मिळाली असून त्यापैकी ४४२ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. या योजनेवर १४ कोटी वीस लाख लाख रुपयांचा खर्च झालेला आहे. स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्र वातानुकूलित करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत ३७ लाख रुपयांची तरतूद मंजूर आहे. 

महानगरपालिकेच्या महसुली उत्पन्नातून महसुली खर्चासाठी महिला व बालकल्याण योजना दोन कोटी चार लाख, मागासवर्गीय कल्याणासाठी दोन कोटी, अपंग कल्याण निधी एक कोटी २२ लाख, क्रीडांगण विकास ५० लाख, कर्ज परतफेडीकरिता तरतूद तीन कोटी, अधिकारी-कर्मचारी वेतन व भत्त्यांसाठी ५४ कोटी ४९ लाख, सुधारित आकृतिबंध नवीन वाढीव पदाकरिता दोन कोटी, मनपा रुग्णालये व दवाखान्याकरिता औषधे, साहित्य खरेदीसाठी दोन कोटी ३६ लाख, रोग निर्मूलन हंगामी उपाययोजनेकरिता ८८ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. मनपा कोंडवाडा दुरुस्तीसाठी १५ लाख, शिक्षण विभागाकरिता एक कोटी ५१ लाख, सार्वजनिक उद्याने व वृक्षलागवड देखभाल दुरुस्तीकरीता ६५ लाख, ग्रंथालय विभागाकरिता ४०.७५ लाख, भूसंपादन व आरक्षणाकरिता चार कोटी २० लाख तर कर्मचारी व नगरसेवक प्रशिक्षणासाठी ३० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. एकूण महसुली भांडवली खर्चासाठी १३ कोटी ५१ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये नवीन रस्त्यांकरिता दोन कोटी, नवीन गटारांकरिता दोन कोटी, नवीन पाइपलाइनकरिता ५० लाख, तातडीच्या पाणीपुरवठा योजनेकरिता ५० लाख, प्रभाग तेथे उद्यान व बालोद्यान विकसित करणे, तसेच शासनाच्या निर्देशाप्रमाणे एकूण महसुली भांडवली खर्चाच्या २५ टक्केप्रमाणे घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी व्यवस्थापनाकरिता तरतूद करण्यात आली असल्याचे श्री. हंगे यांनी सांगितले. आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकावर स्थायी समितीच्या सदस्यांनी ता. १६ ते २६ फेब्रुवारीपर्यंत आपल्या लेखी सूचना द्याव्यात, असे स्थायी समिती सभापती अशोक गोविंदपूरकर यांनी सांगितले.

Web Title: marathi news latur news municipal budget