लातुरातील 15 हजार पथदिव्यांची वीज गुल 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 मार्च 2018

लातूर - महावितरण अधिकाऱ्यांच्या हातापाया पडून कशीबशी पाणीपुरवठा योजनेची वीज जोडणी करून घेण्यात महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांना यश आले. पाणीपुरवठा सुरू होत नाही तोच महावितरणने शहरातील 15 हजार पथदिव्यांची वीज तोडली आहे. साडेबारा कोटी रुपयांची थकबाकीचा डोंगर महापालिकेच्या अंगावर आहे. पैसे भरले तर वीज सुरू, अशी स्पष्ट भूमिका महावितरणने घेतल्याने शहर सध्या अंधारात आहे. 

महापालिकेकडे महावितरणची कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. पथदिव्यांची साडेबारा कोटींची थकबाकी असतानाच दर महिन्याला 24 लाखांचे बिलही येत आहे. महावितरणने जानेवारीमध्येही पथदिव्यांचे अशीच वीज कट केली होती. नंतर काही रक्कम भरल्यानंतर ती सुरू करण्यात आली होती. गेल्या आठवड्यात पाणीपुरवठ्याची वीज महावितरणने तोडली. चार दिवस ती सुरूच करण्यात आली नाही. महापौर सुरेश पवार यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन पैसे भरू, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. 

दरम्यान, चार दिवस शहराचा पाणीपुरवठा बंद राहिला. परिणामी शहरातील प्रत्येक भागाला आठ दिवसाला येणारे पाणी बारा ते तेरा दिवसांवर गेले. पाणी असून टंचाईला लातूरकरांना सामोरे जावे लागले. पाणीपुरवठा सुरू होत नाही तोच महावितरणने आपले लक्ष पथदिव्यांकडे वळविले आहे. 

शहरातील हजारो पथदिव्यांसाठी महावितरणचे लघुदाबाच्या 484 वीज जोडण्या आहेत. यापैकी 450 वीज जोडण्या तोडण्यात आल्या आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून महापालिकेने विजेचे चालू बिलच भरलेले नाही. याचा परिणाम शहरातील मुख्य रस्त्यावरील स्ट्रीट लाईटसोबतच प्रत्येक नगरातील सुमारे 15 हजार पथदिव्यांची वीज गुल झाली आहे. रस्त्यावर रात्री अंधार होत आहे. लातूरकरांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. 

परीक्षेच्या काळात अंधार 
लातूर हे शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे. सध्या दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. मुले पहाटेच्या वेळी घरातून क्‍लासेससाठी बाहेर पडतात. त्यात रस्त्यावर अंधार राहत असल्याने त्यांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. 

Web Title: marathi news latur street lamp