घाटीत एटीएममध्ये संशयास्पद वस्तू ठेऊन दुचाकीस्वाराने काढला पळ 

योगेश पायघन
रविवार, 24 डिसेंबर 2017

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात असलेल्या एटीएममध्ये रविवारी (ता. 24) दुपारी सव्वाएकच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या युवकाने एक साऊंड मॅपिंग सदृश्य संशयास्पद यंत्र ठेऊन पळ काढला. ते यंत्र बॉम्बसारखेच दिसत असल्याने अफवेने घाटीत एकच गोंधळ उडाला. 

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनसार, एक दुचाकीस्वार घाटीच्या अधीक्षक कार्यालयाशेजारी पोलिस चौकीसमोर सेंट्रल बॅंक एटीएमजवळ आला. त्याने दुचाकीवरुन उतरुन रेडीओसारखे दिसणारे एक बटन असलेले एक संशयास्पद यंत्र एटीएम केबीन बोर्डच्या मागे असलेल्या कप्प्यात ठेवले आणि तेथून पळ काढला. तो प्रकार रुग्णांच्या नातेवाईकांच्या लक्षात आला. त्यांनी मेस्कोच्या सुरक्षारक्षकांना याची कल्पना दिली. या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेत सुरक्षारक्षकांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे यांना याची माहिती दिली. 

त्यांनी कंट्रोल रुमला फोन करत बॉंम्बशोधक व नाशक पथकाला घटनास्थळी पाचरण करण्यात आले. तोपर्यंत एमएसएफच्या जवानांनी जमलेली गर्दी नियंत्रणात आणण्याचे काम केले. दीड वाजता बॉम्बशोधक पथकाचे जवान घटनास्थळी पोहचले त्यानी तपासणी केली. त्यांनी घाबरण्यासारखे काही कारण नसल्याचे सांगितले. ते इलेक्‍ट्रॉनीक डीव्हाईस त्यांनी ताब्यात घेतले असून, बॉम्बशोधक पथक परतले. अर्धातासांची धावपळ आणि अफवांनी मात्र घाटीत प्रशासनाची व एमएसएफच्या जवानांची चांगलीच धावपळ झाली. 

Web Title: marathi news local news aurangabad news suspected thing found police