ऑटोरिक्षाला लागलेल्या आगीत दोन चिमुकल्यांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जानेवारी 2018

औरंगाबाद -  प्रवरासंगमजवळ सोमवारी (ता. 8) मध्यरात्री अ‍ॅटोरिक्षाला लागलेल्या आगीत दोन चिमुकल्यांचा जळून मृत्यू झाला. तर गंभीर भाजलेल्या तिसऱ्या मुलाचा उपचारादरम्यान औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. असे घाटी रुग्णालयाकडून सांगण्यात आले.

शफिक रफिक कुरेशी (रा. संजयनगर नं-५ औरंगाबाद) यांच्या माहितीनुसार, नेवासा तालुक्यातील चांदा येथील कुरेशी यांच्या नातेवाईकांचा सोमवारी साखरपुडा होता. त्यासाठी कुरेशी कुटुंबिय औरंगाबादहून चांदा येथे आले. रात्री कार्यक्रम संपल्यानंतर रिक्षामध्ये चालक समीर हनिफ कुरेशी, रफिक हाजिजाफर कुरेशी (वय ५५), जुनेद शाफिक कुरेशी (वय १३), नमिरा शाफिक कुरेशी (वय ८), महेविश आतिक कुरेशी (वय ७) (सर्व रा़ संजयनगर नं-५ औरंगाबाद) हे रात्री ११ वाजण्याच्या सुमारास औरंगाबादकडे निघाले होते. प्रवरसंगम जवळील पेट्रोल पंपासमोर रिक्षाने पेट घेतला. त्यात नमिरा शाफिक कुरेशी (वय ८), महेविश आतिक कुरेशी (वय ७) या दोन चिमुरड्यांचा होरपळून जागेवरच मृत्यू झाला. यातील जखमी जुनेद शाफिक कुरेशी (वय १३) याचा औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

Web Title: marathi news marathwada auto fire two childrens die