चिंचोटी ग्रामस्थांचे उपोषण; मुख्यध्यापकाला निलंबित करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

वडवणी - वडवणी तालुक्यातील चिंचोटी जिल्हापरिषद प्राथमिक शाळेत प्रभारी मुख्याध्यापक मुंडे सहदेव बळीराम यांच्या गैर कारभाराची चौकशी करून निलंबन करावे, या मागणीसाठी आज (ता. १५) चिंचोटी येथील ग्रामस्थांनी गटशिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

चिंचोटी प्रा. शा. चे मुख्याध्यापक ढाकणे आर बी हे आहेत. ते २० जानेवारीपासून अर्जित रजेवर असल्याने त्यांनी या कालावधीत प्रभारी मुख्याध्यापक पदाचा कार्यभार याच शाळेचे पदवीधर शिक्षक मुंडे सहदेव बळीराम यांच्याकडे होता याकाळात प्रभारी मुख्याध्यापक मुंडे यांनी ३ फेब्रुवारी रोजी शालेय समितीची अधिकार नसतानाही नियमबाह्य बैठक घेतली. सदरील बैठक रद्द करण्यात यावी तसेच बैठकीमध्ये शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी नेमलेल्या कामगारांना बेकायदेशीररित्या ठराव घेऊन व कुठलीही पूर्वकल्पना न देता कामावरून कमी करण्यात आले. त्यांच्या जागी दोन नवीन कामगार रुजू करण्यात आले. त्यामुळे जे जुने पोषण आहार शिजवणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आल्याने त्यांना तातडीने कामावर रुजू करावे व संबंधित प्रभारी मुख्याध्यापक मुंडे यांची चौकशी करून निलंबनाची कार्यवाही करावी, या मागण्यासाठी चिंचोटी ग्रामस्थांनी गटशिक्षण अधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. यावेळी कामावरून कमी करण्यात आलेले सुदमती कोंडीबा सपकाळ, विक्रम कोंडीबा सपकाळ यांच्यासह चिंचोटी ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: marathi news marathwada beed principal suspend

टॅग्स