मराठवाड्यातील परिस्थिती पाहून मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांची मने हेलावली

सुषेन जाधव
रविवार, 11 मार्च 2018

मराठवाड्यातील पीक परिस्थितीबाबत शेतकऱ्यांशी बोलून मन हेलावून गेल्याची भावना या शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

औरंगाबाद - मध्य प्रदेशातील उज्जेन येथील शेतकऱ्यांचा महाराष्ट्रातील शेती अभ्यासदौरा आयोजित करण्यात आला होता. दरम्यान 25 शेतकऱ्यांच्या चमूने औरंगाबादेतील विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्राला भेट दिली. तेव्हा मराठवाड्यातील पीक परिस्थितीबाबत शेतकऱ्यांशी बोलून मन हेलावून गेल्याची भावना या शेतकऱ्यांनी व्यक्त केली. नुकसान भरपाई मिळणारी भावांतर भूगतान योजना महाराष्ट्रात लागू केली तर शेतकरी अडचणीत येणार नाही, असेही शेतकरी म्हणाले. केंद्राचे रामेश्वर ठोंबरे यांनी शेतकऱ्यांना मराठवाड्यातील पिकांविषयी माहिती दिलो.

Web Title: marathi news marathwada madhya pradesh farmer study tour