पान मसाला घेऊन जाणारा ट्रक जळून खाक 

दिलीप दखने
मंगळवार, 20 मार्च 2018

वडीगोद्री (जि. जालना) -  सोलापूर-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर वडीगोद्रीजवळ (ता अंबड) पान मसाला घेऊन औरंगाबादकडे जाणारा ट्रक मंगळवारी (ता.२०) पहाटे जळाला. यामध्ये अंदाजे एक कोटी रूपयांचा माल असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. 

ट्रकला आग कशी लागली याचे कारण समजु शकले नासल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. गोंदी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उप निरक्षक अनिल परजने यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकचा ड्रायव्हर फरार आहे. आगीत कोणतीही जीवीत हानी झाली नाही. पोलिस ट्रकच्या मालकाचा व ड्रायव्हरचा शोध घेत आहे. गोदी पोलिसांनी उस्मानाबाद आर. टी. ओ.कडे या ट्रकबाबत चौकशी सुरू केली आहे. 

अंबड येथे सोमवारी (ता. १९) गुटखा पकडला आसतानाच ही घटना घल्याने ट्रक जाळला की जळाला या बाबत उलट सुलट चर्चा आहे. ट्रकमध्ये केवळ पान मसालाच होता की त्या सोबत तंबाखू मिश्रीत गुटख्याही याची कसुन तपासणी सुरू असल्याचे श्री. परजने यांनी सांगितले.

Web Title: marathi news marathwada pan masala truck accident