गणपतराव मोरगे यांचे मुंबईत निधन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 मार्च 2018

मांडूरकी (ता.चाकूर) येथील सुपूत्र, जागृती साखर कारखान्याचे संचालक गणपतराव बळीराम मोरगे (वय-६१ वर्षे) यांचे मुंबई येथे उपचारांदरम्यान शुक्रवारी (ता.२) दुपारी पावणेतीनच्या सुमारास निधन झाले.

चाकूर : मांडूरकी (ता.चाकूर) येथील सुपूत्र, जागृती साखर कारखान्याचे संचालक गणपतराव बळीराम मोरगे (वय-६१ वर्षे) यांचे मुंबई येथे उपचारांदरम्यान शुक्रवारी (ता.२) दुपारी पावणेतीनच्या सुमारास निधन झाले. त्यांच्यावर शनिवारी (ता.३) दुपारी एक वाजता मोरगे फार्म, भोसी, ता.भोकर, जि.नांदेड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

त्यांची प्रकृती अस्वास्थतेमुळे मागील आठवड्यात नांदेडहून मुंबई येथे उपचारांसाठी एअर अॅम्ब्युलन्सने नेण्यात आले होते. त्यांच्यावर मुंबई येथील लिलावती रूग्णालयात कर्करोगावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्यामागे आई, पत्नी, मुलगा, तीन मुली, सून, जावई, चार भाऊ, बहिण, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मांडुरकीचे सरपंच शंकरराव मोरगे त्यांचे बंधू होत. प्रतिकूल परिस्थितीतून गणपतराव मोरगे यांनी शारदा कन्स्ट्रक्शन अॅण्ड कार्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी राज्यासह परराज्यात अनेक कामे केली आहेत.

Web Title: Marathi News Nanded News Ganpatrao Morage Passes Away