दगडाने ठेचून पोलिसाचा खून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

नांदेड - घरासमोर राहणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराने पूर्ववैमनस्यातून स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस कर्मचारी शिवाजी पुंडलिक शिंदे यांचा दगडाने ठेचून खून केला. ही खळबळजनक घटना रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास शहरातील दत्तनगर भागात घडली. लॉंड्रीत कपडे देण्यासाठी जात असताना बेसावध असलेल्या शिंदे यांचा हल्ल्यानंतर काही क्षणांतच मृत्यू झाला.

आरोपीचे नाव तुळजासिंह कन्हैयासिंह ठाकूर (वय 47) असे असून त्याच्यावर चोरी, दादागिरी, प्राणघातक हल्ला, हुंडाबळी यांसारखे गुन्हे शहरातील विविध पोलिस ठाण्यांत दाखल आहेत. तुळजासिंहच्या घरासमोरच शिवाजी शिंदे यांचे घर आहे. प्रत्येक प्रकरणात तुळजासिंह याच्यावर कारवाई झाल्यानंतर ती शिंदे यांच्या सांगण्यावरूनच झाल्याचा संशय तो घेत होता. यावरून त्याने शिंदे यांच्याशी काही वेळा वादही घातला होता. परंतु शिंदे यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच शिंदे हे स्थानिक गुन्हे शाखेत रुजू झाले होते. त्यामुळे तुळजासिंहच्या संशयात आणखी भर पडली. शनिवारी (ता.3) रात्री परभणी येथील उरुसानिमित्त बंदोबस्तानंतर आज पहाटे शिंदे घरी आले होते. सकाळी कपडे इस्त्री करण्यासाठी ते लॉंड्रीत गेले. या वेळी तुळजासिंहने शिंदे यांच्या डोक्‍यात दगड घातला. काही कळायच्या आतच शिंदे खाली कोसळले. त्यानंतर तुळजासिंह याने दोन - तीन वेळा दगडाने शिंदे यांचा चेहरा ठेचला. जवळील खंजरनेही वार केले. त्यामुळे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शिंदे यांचा काही मिनिटांतच मृत्यू झाला.

पोलिसांकडे सीसी टीव्ही चित्रण
अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरात धावपळ उडाली. तुळजासिंह घटनास्थळावरून फरारी झाला. पळून जाताना त्याने एका दुचाकीस्वाराला लिफ्ट मागितली होती. त्या दुचाकीस्वाराचे सीसी टीव्ही चित्रण पोलिसांच्या हाती लागले आहे.

Web Title: marathi news nanded news police murder