दुहेरी खून प्रकरणात महिलेला जन्मठेप 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जानेवारी 2018

उस्मानाबाद  - परिवहन महामंडळातील वाहक मीनाक्षी अंकुश पांचाळ हिला दुहेरी खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा; तसेच दोन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. विशेष म्हणजे सर्वच साक्षीदार फितूर झाल्यानंतरही परिस्थितीजन्य पुरावा, मृताचा मृत्युपूर्व जबाब आदी मुद्‌द्‌यांवरून तिला ही शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी हा निर्णय दिला आहे. 

याबाबत सहायक सरकारी वकील जे. व्ही. देशमुख यांनी सांगितले, की आरोपी मीनाक्षी पांचाळ ही राज्य परिवहन महामंडळात वाहक म्हणून काम करीत होती. कळंब येथे सासू-सासऱ्यांसह राहत होती. 26 मार्च 2015 रोजी मीनाक्षीने सासू कलावती पांचाळसह तिच्या मांडीवर बसलेली स्वत-ची मुलगी चिमुकली श्रद्धा यांच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. यामध्ये दोघींचा मृत्यू झाला होता. 

Web Title: marathi news osmanabad murder case Woman life imprisonment