जनभावनेचा आदर राखता 'पद्मावत' चित्रपट पाहू नये - करणी सेना

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जानेवारी 2018

औरंगाबाद - संजय लीला भंन्साळी दिग्दर्शित 'पद्मावत' हा चित्रपट सती महाराणी पद्मावती यांच्या आयुष्याशी संबंधित असून इतिहासाची छेडछाड करुन निर्मित केलेला आहे. त्यामुळे राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या जनभावना दुखावल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. या सर्वांच्या जनभावनांचा आदर करुन विविध संघटनांनी सदरील चित्रपट प्रदर्शित करु नये म्हणून राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या मागणीला पाठिंबा दर्शविला आहे. 

याबाबत जनभावनेचा आदर राखता महाराणी पद्मावत चित्रपट पाहण्यासाठी नागरिकांनी न जाता भारतीय संस्कृतीचा आदर राखावा असे आवाहन प्रदेश महासचिव देविचंदसिंह बारवाल आणि शहरातील 11 विविध संघटनांनी केले असून त्यात प्रामुख्याने स्वाभिमानी छावा संघटनेचे रमेश केरेपाटील, सर्व मराठा संघटना प्रतिनिधी, छावा मराठा युवा संघटना, आखिल भारतीय छावा संघटना, बजरंग दल, अखिल भारतीय शिवक्रांती युवा, झुंजार छावा, राजपूत संघ, अखिल भारतीय ब्राम्हण संघ, मुस्लिम विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. 23) आयोजित पत्रकार केले आहे. याबाबतचे विनंतीपत्र विभागीय आयुक्तांना व पोलिस आयुक्तांना देण्यात आले आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे लोकभावनेचा अनादर होत असल्याने तो थांबवावा. तसेच महाराष्ट्र शासनाने आपल्या अधिकारांचा वापर करुन या चित्रपटावर बंदी आणावी, अशी विनंती यावेळी संघटनांतर्फे करण्यात आली.

Web Title: marathi news padmavat hindi movie objection karani sena