संघ कार्यालयावर दगडफेक करून कार्यालय जाळण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

परभणी : कोरेगाव भीमा येथील घटनेचे पडसाद सलग तिसऱ्या दिवशीही (ता. 3) परभणी शहरात पहावयास मिळाले. संपप्त जमावाने स्टेशनरोडवरील संघ कार्यालयावर दगडफेक करून कार्यालय जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण झाला आहे.

शहरातील स्टेशनरोड, बसस्थानक, जिल्हाधिकारी कार्यालय या परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बुधवारी कोरेगाव भीमा प्रकरणामुळे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्यामुळे सकाळपासूनच शहरातील बाजारपेठ बंद होत्या. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या काही घरे व दुकांनावर अज्ञात जमावाने तुफान दगडफेक केली. त्यानंतर स्टेशनरोडवरील केशव प्रेरणा या संघ कार्यालयावर अज्ञात जमावाने दगडफेक करत कार्यालयास जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात कार्यालयाची खडकी, खोलीतील गादी व पुस्तके जळाली.

या दोन घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण शहरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विशेषत:स्टेशनरोड, बसस्थानक, जिल्हाधिकारी कार्यालय या परिसरात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे

Web Title: Marathi news Parbhani news attacked on sangh office