माजी आमदार कुंडलिक नागरे यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 मार्च 2018

गेल्या काही दिवसापासून आजारी होते. पंधरा दिवसांपूर्वी त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने मुंबई येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तीन दिवसांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि रविवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.

जिंतूर : जिंतूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार व परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान अध्यक्ष कुंडलीकराव भगवानराव नागरे (वय ६६) यांचे रविवारी (ता.४) दुपारी दीडच्या सुमारास मुंबई येथे निधन झाले. 

गेल्या काही दिवसापासून आजारी होते. पंधरा दिवसांपूर्वी त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने मुंबई येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तीन दिवसांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि रविवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. 

यावेळी त्यांच्या पत्नी शोभा, सुरेश व बालाजी ही दोन मुले, बहिण मुक्ताबाई आंधळे व अन्य नातेवाईक उपस्थित होते. रात्री उशिरा त्यांचे पार्थिव जिंतूरकडे निघणार असून, सोमवारी (ता.५) येथे पोहचेल. त्यानंतर दुपारी एक ते दीडच्या दरम्यान येलदरी येथील त्यांच्या फार्म हाऊसच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. 

दरम्यान, नागरे यांच्या निधनाचे वृत्त तालुक्यात वाऱ्यासारखे पसरल्याने त्यांच्या नातेवाईक, कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली. मंत्री अर्जुन खोतकर यांनीही येथे जाऊन त्यांची भेट घेतली.

Web Title: Marathi News Parbhani News Former MLA Kundalik Nagare Passes Away