सुरळीत वीजपुरवठ्यासाठी ११ लिंकलाइन मंजूर

केज ः सव्वातीन कोटींच्या खर्चाची तरतूद
nmita mudanda
nmita mudandasakal

अंबाजोगाई : केज मतदार संघाच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीज पुरवठ्यात विस्कळीतपणा होता. तो दूर करण्यासाठी ११ लिंकलाइन मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यात ११ केव्हीच्या नऊ व ३३ केव्हीच्या दोन लिंकलाइनचा समावेश आहे. यासाठी एसीएफ फंडातून तब्बल सव्वा तीन कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी आमदार नमिता मुंदडा यांनी पाठपुरावा केला होता.

विजेच्या वाढत्या मागणीमुळे केज मतदार संघात विविध गावांतील फिडरवर व सद्यःस्थितीतील लिंकलाइनवर मोठा लोड आहे. त्यामुळे सतत वीजपुरवठा विस्कळीत होतो. या गैरसोयीने शेतकरी, व्यावसायिक, ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन आमदार नमिता मुंदडा यांनी या फिडरवरील लोड विभागणी करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर विजेच्या लिंकलाइन वाढविण्याची मागणी केली होती.

आमदार मुंदडा यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून एसीएफ फंडातून केज मतदार संघातील ११ लिंकलाइनसाठी ३ कोटी २६ लाख ६७ हजार रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. या निधीतून केळगाव ते बेळगाव, धावडी ते सोनवळा ११ केव्ही ते सोनवळा फिडर, जानेगाव ते कुंबेफळ फिडर, डीघोळअंबा, चिचखंडी, होळ ते दिपेवडगाव,

११ केव्ही बे फॉर होळ या ११ केव्हीच्या लिंकलाइन तर मालेगाव ते युसुफ वडगाव आणि मस्साजोग ते कुंबेफळ उपकेंद्रातर्गत ३३ केव्हीच्या लिंकलाइन होणार आहेत. ही कामे झाल्यानंतर फिडरवरील लोड विभागणी होऊन विविध गावातील विद्युत पुरवठा सुरळीत होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com