पूर, वीजबळींची संख्या 70 वर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 सप्टेंबर 2016

औरंगाबाद - जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत मराठवाड्यात 70 जणांचा नैसर्गिक आपत्ती कोसळल्याने मृत्यू झाला आहे. यात पुरात वाहून गेल्याने 33, वीज पडून 31, तर भिंत कोसळून व इतर कारणांमुळे सहा जणांचा बळी गेला आहे. 

औरंगाबाद - जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत मराठवाड्यात 70 जणांचा नैसर्गिक आपत्ती कोसळल्याने मृत्यू झाला आहे. यात पुरात वाहून गेल्याने 33, वीज पडून 31, तर भिंत कोसळून व इतर कारणांमुळे सहा जणांचा बळी गेला आहे. 

तीन वर्षांनंतर मराठवाड्यातील अनेक तालुके, गावांत अतिवृष्टी झाली. नदी-नाल्यांना पूर आल्याचे चित्र बघायला मिळाले. सप्टेंबरमध्येच मराठवाड्यात पावसाने वार्षिक सरासरी गाठली आहे. या पावसामुळे समाधानकारक वातावरण असल्याचे चित्र आहे, तर दुसरीकडे अतिवृष्टी होऊन आलेल्या पुरात वाहून गेल्याने मराठवाड्यात 33 जणांचा मृत्यू झाला आहे, तर वीज अंगावर पडून 31 जणांचा बळी गेला. तर वादळ-वाऱ्यामुळे घरावरचे पत्रे उडून मार लागणे, अंगावर भिंत कोसळणे आदी कारणांमुळे सहा जणांना जीव गमवावा लागला आहे. 

केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती (एनडीआरएफ) निकषानुसार नैसर्गिक आपत्तीत मरण पावलेल्या व्यक्‍तीच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची मदत दिली जाते. त्यानुसार मृत्यू पावलेल्या 70 जणांपैकी 47 जणांचे कुटुंबीय मदतीस पात्र ठरले असून प्रशासनाने 1 कोटी 88 लाख रुपये वाटप केले आहे. तर 22 प्रकरणे प्रलंबित आहेत.

नैसर्गिक आपत्तीत मृत्यू 
जिल्हा ------- पुरात वाहून ----- वीज पडून ---- इतर कारणास्तव 

औरंगाबाद ------ 3 ------------ 3 ------------ 0 
जालना --------- 1 ------------ 3 ------------ 1 
परभणी -------- 0 ------------- 4 ------------ 3 
हिंगोली ------- 3 -------------- 5 ------------ 0 
नांदेड --------- 8 ------------- 9 ------------ 0 
बीड ---------- 14 ----------- 3 ------------ 0 
लातूर --------- 4 ------------- 3 ------------ 0 
उस्मानाबाद ---- 0 ------------- 1 ------------ 2 
एकूण --------- 33 ----------- 31 ----------- 6

Web Title: Marathwada 70 people were killed when a natural disaster