सरकारच्या नियोजनाचा बोजवारा - अजित पवार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - शिवस्मारक, इंदू मिलसह अनेक प्रकल्पांचे उद्‌घाटन, कर्जमाफीची घोषणा झाली. मात्र, प्रत्यक्षात आजही त्यांची भयावह अवस्था आहे. शाळा, महाविद्यालयांत क्रीडा शिक्षक नाहीत, मुलांना कसलेही प्रशिक्षण दिले नसताना दहा लाख जणांकडून फुटबॉल खेळण्याची अपेक्षा ठेवता, कोळसा आणण्याकडे दुर्लक्ष केल्याने विजेचा लंपडाव सुरू आहे. एकूणच सरकारच्या नियोजनाचा बोजवारा उडाला असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली. पुरोगामी विचार पटत नसल्याने विचावंतांच्या हत्या केल्या जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

डॉ. उल्हास उढाण लिखित "यशवंतराव चव्हाण : महाराष्ट्राचा आशय' या पुस्तकाचे शुक्रवारी अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन झाले, त्या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ""पुढे जायचे असेल तर अभ्यास करावाच लागेल. सध्याची परिस्थिती भयंकर आहे. अभ्यास करून चांगला पेपर लिहला तरी त्याचा निकाल कधी लागेल, हे सांगणे अवघड आहे. हे मुंबई विद्यापीठाच्या कारभारामुळे पुढे आले आहे. प्रश्‍न सोडविण्याचा अग्रक्रम असायला हवा. मात्र, तो दुर्दैवाने सत्ताधाऱ्यांकडे नाही.'' सांस्कृतिक, क्रीडा, कृषी अशा विविध क्षेत्रांतील नियोजनाचा बोजवारा उडालेला आहे. याबद्दल मंत्री विनोद तावडे यांना कितीही वेळा भेटा, बाबाचे लक्षच नसते, अशी टीकाही त्यांनी केली. या वेळी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष प्राचार्य रा. रं. बोराडे, प्रा. फ. मुं. शिंदे, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे उपस्थित होते. 

Web Title: marathwada ajit pawar