Marathwada Cold : मराठवाड्यात थंडीचा कडाका, उदगीरचे तापमान १०.७ अंशांवर

Marathwada Cold Weather : मराठवाड्यात किमान तापमानात घट झाल्याने रात्री आणि पहाटे थंडीचा कडाका जाणवत आहे. उदगीरमध्ये १०.७, छत्रपती संभाजीनगरमध्ये १२.४ अंश तापमान नोंदले गेले, तर निफाडमध्ये पारा ६.५ अंशांवर घसरला.
Cold conditions intensify across Marathwada as minimum temperatures drop in several districts

Cold conditions intensify across Marathwada as minimum temperatures drop in several districts

esakal
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातही किमान तापमानात घट झाली असून थंडी वाढत आहे. रात्री दहापासून पहाटेपर्यंत कडाका जाणवत आहे. शुक्रवारी (ता. २०) उदगीर (जि. लातूर) येथे १०.७ अंश, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये १२.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाल्याचे भारतीय हवामान विभागातर्फे (आयएमडी) सांगण्यात आले.

Loading content, please wait...