Marathwada : कापसाला ७,२०० रुपये प्रतिक्विंटल भाव

जास्तीचा भाव मिळण्याची शेतकऱ्यांना अाशा, कापूस घरातच ठेवणे केले पसंत
Marathwada news
Marathwada newsesakal

पैठण : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या कापसाला ७,२०० रुपये प्रतिक्विंटल भाव दिला जात आहे. तरीदेखील शेतकऱ्यांनी कापूस विक्रीला आणणे बंद केले आहे. त्यामुळे आता कापूस विक्रीला ''ब्रेक'' लागल्याचे दिसत आहे. मात्र, पुढील काही दिवसांत आणखी भाववाढ होण्याची शक्यता आहे. हेच कापसाचे भाव दहा हजार रुपये प्रतिक्विंटल होण्याची शक्यता शेतकऱ्यातून वर्तविण्यात येत आहे.

Marathwada news
Winter Car Tips : हिवाळ्यात कार गरम ठेवण्यासाठी ब्लोअर वापरताय? एक छोटीशी चूकही ठरू शकते जीवघेणी! अशी घ्या खबरदारी

खरीप हंगामात अतिवृष्टी व सततच्या पावसाने कपाशी पिकांचे खुप नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदा कापसाचे झालेले कमी उत्पादन व अचानक वाढलेल्या मागणीने कापसाच्या भावात तेजी आली आहे. परंतु पैठण तालुक्यात ही तेजी दिसून येत नाही. येत्या काही दिवसांत कापसाच्या भावात तेजी पाहायला मिळणार असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.

Marathwada news
Mens Health Tips : फिट्ट अंडरवेअर वापरणं जीवावर बेतू शकतं, अशी करा योग्य अंडरवेअरची निवड

कापूस लागवडीचा खर्च व कापसाचे कमी होणारे उत्पन्न यातून मिळणारे पैसे यांची गोळाबेरीज केली तर शेतकरी सर्वाधिक अडचणीत सापडलेला दिसतो. त्यामुळे यंदा कापसाला चांगला भाव मिळावा, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे. कापसाचे दर दिवसेंदिवस‌ घसरु लागले. त्यामुळे शेतकरी अधिकच चिंताग्रस्त वाटू लागला आहे. अनेक शेतकऱ्यांनी कपाशी लागवडीसाठी हा उसने पैसे घेवून कपाशीची लागवड केली. त्यातच मध्यतंरी पावसाने दगा दिल्यामुळे कपाशीसह खरिपाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यातच जेमतेम झालेल्या कपाशीच्या उत्पन्नालाही कमी भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हात उसने घेतलेले पैसे कसे फेडावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आजघडीला ठाकला आहे.

Marathwada news
Parenting Tips : मुलांचा आत्मविश्वास कमी झाला आहे? मग, ‘या’ टीप्सची घ्या मदत

दिवाळीपासून कापूस विक्री सुरु झाली आहे. सुरूवातीला कापसाचे दर ७ हजार ४०० रुपये होते. त्यानंतर दरात तेजी राहील, असे शेतकऱ्यांना वाटले होते. परंतु कापसाला म्हणावा तेवढा भाव काही मिळत नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सुरुवातीपासूनच ४०० रुपयांनी भाव घसले आहेत. सध्या ६ हजार ९०० रुपये क्विंटलपर्यंत कापसाचा भाव पोहोचला आहे. त्यामुळे कापूस लागवडीचा खर्च व कापसाला मिळणारा फरक पहाता शेतकरीवर्ग चिंतीत झाला आहे. सध्या कापसाला ७,२०० प्रतिक्विंटल दर दिला जात आहे, असे बाजार समितीचे सचिव नितिन विखे यांनी सांगितले.

कापूस वेचणी ही महागली!

पैठण तालुक्यातील ग्रामीण भागात काही व्यापारी शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करत आहे. परंतु कमी भाव मिळत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. सध्या बाजारात सात ते साडेसात हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे.‌ कापूस वेचण्याची लगबग सुरू आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांना मजूर मिळत नसल्याचे चित्र आहे.‌ मजुरांअभावी कापूस वेचणी महागली आहे.कापूस वेचणाऱ्याला प्रतिकिलो १० रुपये शेतकऱ्यांना मोजावे लागत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com