Marathwada : पंधरा वर्षांची प्रतीक्षा संपली,पंधरा दिवसात गंगापूर साखर कारखाना सुरू होणार

कृष्णा पाटील डोणगावकरांचे यश : हालचालींना वेग : तीस कोटींची मशीनरी बसवली
Marathwada news
Marathwada newsesakal

गंगापूर : तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांची पंधरा वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली असून, पुढील दिवसात गंगापूर सहकारी साखर कारखाना सुरू होणार आहे. कारखाना सुरू होण्याच्या हालचालींना वेग आला असून, जय हिंद साखर कारखान्याने हा कारखाना भाडे तत्वावर घेतला आहे. निवडणुकीत कारखान्याचे अध्यक्ष कृष्णा पाटील डोणगावकर यांनी कारखाना सुरू करणार असे भक्कम आश्वासन शेतकर्‍यांना दिले होते.

तोपर्यंत मी सत्कार स्वीकारणार नाही अशी भूमिका घेतली होती. पंधरा दिवसात कारखाना सुरू होताच गावोगावी जाऊन मदतरांतर्फे सत्कार स्वीकारणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. तसेच शेतकर्‍यांना साखर वाटप देखील करण्यात येणार आहे. साखर कारखाना सुरु होत असल्याने गोदाकाठी असलेल्या पन्नास गावातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांसह कामगार, मजूर, व्यापारी यांचा व्यावहारिक सामाजिक तसेच राजकीय गोष्टींवर प्रभाव वाढणार आहे. त्यामुळे बाजारपेठेत मोठी उलढाल होऊन तालुक्यात सुबत्ता येणार आहे.

Marathwada news
Skin Care Tips : त्वचेसाठी फायदेशीर आहे गव्हाचे पीठ, ‘या’ पद्धतीने करा वापर

कारखाना कर्जमुक्त होणार

गंगापूर येथील सहकारी साखर कारखाना सोलापूरच्या जयहिंद शुगर्सने भाड्याने १५ वर्षे भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतला आहे. टप्प्याटप्प्याने हा करार वाढविला जाणार आहे. गंगापूर कारखान्याला वार्षिक दहा कोटींचे भाडे मिळणार आहे. त्यामुळे आगामी काळात कारखान्यावरील सर्व कर्ज नील होऊन कारखान्याची भरभराट होणार असल्याचे स्पष्ट चित्र चित्र दिसत आहे.

Marathwada news
Uric Acid Control Tips : युरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्यासाठी ‘या’ भाज्यांचा करा आहारात समावेश

मी निवडणुकीत शब्द दिला होता. कारखाना सुरू करणार तेंव्हाच सत्कार स्वीकारणार. पुढील पंधरा दिवसात कारखाना सुरू होणार आहे. गावोगावी साखर वाटपाचा कार्यक्रम घेऊनच सत्कार स्वीकारणार आहे. ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा यंदा हक्काच्या साखर कारखान्यात ऊस जाणार आहे.

- कृष्णा पाटील डोणगावकर (अध्यक्ष, गंगापूर साखर कारखाना)

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com