"जलयुक्त'च्या कामांसाठी मराठवाड्याला 236 कोटी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

लातूर  - जलयुक्त शिवार अभियानातून पावसाळ्यापूर्वी कामे मार्गी लागावीत यासाठी शासनाने मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांना 236 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. 

महाराष्ट्र टंचाईमुक्त करण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान सुरू केले आहे. यात 2016-17 मध्ये राज्यात पाच हजार 288, 2017-18 मध्ये पाच हजार 31 गावे निवडण्यात आली होती. या गावांमधील कामे करण्यास ता. 30 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तसेच 2018-19 मध्ये राज्यात सहा हजार 200 गावांचे उद्दिष्ट आहे. या कामासाठी राज्यस्तरावर शासनाने एक हजार कोटी निधी उपलब्ध करून दिला आहे. 

पावसाळ्यापूर्वी कामे झाल्यावरच पावसाचे पाणी साठवून ठेवता येणार आहे. त्यामुळे दोन-अडीच महिन्यांत ही कामे गतीने होऊन पूर्ण व्हावीत याकरिता शासनाने आता निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेच्या कामालाही पैसा दिला जाणार आहे. तसेच सध्या मराठवाड्यात पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धा घेतली जात आहे. या स्पर्धेतील सहभागी गावांसाठी तरतूद उपलब्ध करून दिली जाणार आहे. हा निधी उपलब्ध होत असल्याने मराठवाड्यातील जलयुक्त शिवार योजनेच्या कामाला गती येण्यास मदत होणार आहे. 

जिल्हा ------------मिळणारा निधी कोटीमध्ये 
औरंगाबाद-------------39.93 
जालना--------------34.95 
बीड------------------38.32 
परभणी-------------20.94 
हिंगोली----------------16.22 
नांदेड--------------36.54 
लातूर----------------26.02 
उस्मानाबाद------------23.08 
---------------------------- 
एकूण-------------------236.00 

Web Title: Marathwada has 236 crores for jalyukat shivar abhiyan works