Flood Situation in Beed and Solapur
esakal
गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे हजारो हेक्टर पिकं पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. तसेच येथील जनजीवनही पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. अनेकांचे संसार पाण्यात वाहून गेले आहेत. सोमवारी रात्री झालेल्या पावसानंतर बीड, सोलापूर आणि धारशिवमध्ये शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.