esakal | Hingoli: आजपासून खादीच्या कपड्यांवर वीस टक्के सूट
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

हिंगोली : आजपासून खादीच्या कपड्यांवर वीस टक्के सूट

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : दरवर्षी महात्मा गांधी यांच्या जयंती पासून खादीच्या कपड्यावर सुट दिली जाते. यावर्षी देखील शनिवारपासून (ता. दोन) खादीच्या कपड्यावर वीस टक्के सुट दिली जाणार असून ती सहा नोव्हेंबर पर्यंत राहणार आहे. यावर्षी खादी भ़ांडारावर खादीच्या रंगीबेरंगी साड्या देखील उपलब्ध झाल्या आहेत.

दरवर्षी महात्मा गांधी जयंती पासून खादीच्या कपड्यावर गांधी जयंती पासून सुट दिली जाते. खादीचा प्रचार व प्रसार जास्तीत जास्त व्हावा हा या मागचा उद्देश असतो. पुर्वी वयोवृद्ध नागरिकच खादीचा वापर करीत असत तसेच खादीमध्ये पुर्वी एकच रंग असायचा आता यात आमुलाग्र बदल करण्यात आले आहेत. युवकांच्या पसंतीस येतील असे रंगीबेरंगी, चेकस, प्लेन अशा प्रकारचे वेगवेगळ्या डिझाइनचे कपडे उपलब्ध झाले आहेत.

हेही वाचा: पाथरीत विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

मागच्या काही वर्षांपासून युवका मध्ये खादीची आवड निर्माण झाल्याने तसेच शासकीय, निमशासकीय कार्यालयात देखील खादीचे कपडे वापरणाऱ्यांची संख्या अधिक झाली आहे. दरम्यान शनिवारी पासून खादीच्या कपड्यावर वीस टक्के सुट देण्यात आली असुन ही सुट सहा नोव्हेंबर पर्यंत कायम राहणार आहे. शहरातील रामलीला मैदानावर असलेल्या खादी भांडारात शनिवार पासून खादीचे कपडे वीस टक्के सुट प्रमाणे उपलब्ध होणार आहेत. यावर्षी खादी भ़ांडारावर प्रथमच खादीच्या साड्या उपलब्ध झाल्या आहेत. या साड्यांची किमंत एक हजार ४०० ते १६०० पर्यंत आहे. शर्टींग मध्ये १५० पासून ते १६५० रुपये मिटर प्रमाणे रंगीबेरंगी कपडे उपलब्ध आहेत. शुटिंग मध्ये ४९० ते ९६५ रुपये मिटर प्रमाणे कपडे उपलब्ध झाले आहेत. यासह लुंगी, टावेल, संतरंजी आदी कपडे उपलब्ध झाले आहेत.

खादी भांडारात महात्मा गांधी जयंती पासून खादीच्या कपड्यावर वीस टक्के सुट देण्यात आली आहे. ती सहा नोव्हेंबर पर्यंत राहणार आहे. रंगीबेरंगी खादीसह यावर्षी साड्या देखील उपलब्ध झाल्या आहेत.

- गणेश कऱ्हाळे

loading image
go to top