‘मराठवाडा इनोव्हेशन’ला प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

नोंदणीला मुदतवाढ 
स्पर्धेला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता मॅजिकतर्फे या स्पर्धेसाठीच्या नोंदणीची तारीख वाढवून ३० जुलै करण्यात आली आहे. सध्या स्पर्धकांकडून शेती, ऑटोमोबाईल, आयओटी, रोबोटिक्‍स, होम आणि इंडस्ट्रिअल ऑटोमेशन, माहिती तंत्रज्ञान, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, पर्यटन, पर्यावरणीय उपाय आणि हेल्थ या विषयांवर आधारित संकल्पना स्पर्धेसाठी आल्या आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी http://magicaurangabad.com/marathwada-innovation-challenge/ यावर नोंदणी करावी, असे आवाहन संचालक आशिष गर्दे यांनी केले आहे.

औरंगाबाद - स्टार्टअपच्या माध्यमातून उद्योगजगतात उभे राहू पाहणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘सीएमआयए’च्या मराठवाडा ॲक्‍सिलरेटर फॉर ग्रोथ ॲण्ड इन्क्‍युबेशन कौन्सिलतर्फे (मॅजिक) ‘मराठवाडा इनोव्हेशन चॅलेंज २०१९’ स्पर्धा होणार आहे. 

या स्पर्धेत सर्वोत्तम संकल्पनांचा गौरव करून त्यांना उद्योगात रूपांतरित करण्यासाठी संपूर्ण सहकार्यही केले जाणार आहे. त्यासाठी देशातील ३५ शहरांमधून १७१ स्पर्धा अर्ज ‘मॅजिक’कडे आले आहेत. विशेष म्हणजे यातील १७ स्पर्धक हे डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रिअल प्रमोशन ॲण्ड पॉलिसीची (डीआयपीपी) संलग्नता प्राप्त आहेत. पाच स्पर्धकांनी लघू आणि सूक्ष्म उद्योगमंत्रालयाकडे आपल्या स्टार्टअपची नोंदणी केली आहे. १७१ स्पर्धक संघांपैकी २१ संघांकडे आपले पेटंट आहेत. ६२ संघ ग्राहकांपर्यंत आपले उत्पादन पोचवतात, तर ६६ संघांकडे आपले प्रोटोटाइप आहेत. 

सर्व अर्जांची छाननी सात ऑगस्टपर्यंत होईल. निवडलेल्या कल्पनांवर १६ आणि १७ ऑगस्टदरम्यान खल होणार आहे. संघांना आपल्या संकल्पना आणि त्यासाठीची भूमिका मंडण्यासाठी ३१ ऑगस्टला वेळ दिला जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathwada Innovation Challenge 2019 Competition