सावधान...! मराठवाड्यात हुमनीचे भुंगेरे निघण्यास सुरवात

file photo
file photo
Updated on

परभणी : मान्सूनपूर्व पावसामुळे मराठवाड्यातील काही भागात हुमनी किडीचे प्रौढ भुंगेरे निघत आहेत. यापुढेही पाऊस पडल्यावर हे प्रमाण वाढणार असल्याचा इशारा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी कीटकशास्त्र विभागाने दिली आहे. तसेच त्यावर वेळीच सामूहिक उपाययोजना करण्याचा सल्लादेखील दिला आहे.
मराठवाड्यातील खरीप हंगामातील पिकांवर मागील चारवर्षांपासून हुमणी किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. थेट पिकांना हल्ला होत असल्याने सोयाबीन, कपाशी, तूर, ऊस या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे दरवर्षी उपाययोजना करणे गरजेचे आहे. सध्या मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावत असल्याने या किडीचे प्रोढ भुंगेरे काही भागात अढळून येत आहेत. त्यामुळे वेळीच उपाययोदना केल्या तर मोठा प्रादुर्भाव रोखता येऊ शकतो. त्यासाठी कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाने सल्ला दिला आहे.

अशी वाढ होते हुमनीची 
हुमणी किडींचे कोष अवस्‍थेत जमिनीत राहतात, पाऊस पडल्‍यास सुप्त अवस्थेतील भुंगे जमिनीतून बाहेर पडत आहे. हुमणीच्या प्रौढ, अंडी, अळी व कोष या चार अवस्था असतात. प्रौढ अवस्था ही बाभूळ, कडुलिंब, बोर आदी  झाडांवर उपजिविका करतात. तर अळी अवस्था पिकांच्या मुळा कुडतुडून नुकसान करते. प्रौढ भुंगेरे जमिनीतून निघाल्यानंतर ते बाभूळ, कडुलिंब, बोर या झाडांवर राहतात व त्यांचे मिलन होऊन जमिनीत अंडी देतात व अंड्यातून निघालेल्या अळ्या पिकांना नुकसान पोचवितात. त्यामुळे सध्या जमिनीतून निघालेल्या हुमणीच्या प्रौढ भुंगेऱ्यांचे वेळीच व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. प्रौढ भुंगेऱ्यांचे व्यवस्थापन अंडी घालण्याअगोदरच झाल्यामुळे अळीपासून पिकांना होणारे नुकसान टाळता येते. 

असे करा व्यवस्थापन
झाडाच्या फांद्या हालवून खाली पडलेल्या भुंगेऱ्याचा बंदोबस्त करावा. मार्च ते जून महिन्‍यात चांगला पाऊस पडताच सूर्यास्तानंतर सुप्तावस्थेतील प्रौढ भुंगेरे जमिनीतून बाहेर येऊन बाभूळ, कडुलिंब आदी झाडांवर पाने खाण्यासाठी व मिलनासाठी जमा होतात. झाडावर जमा झालेली भुंगेरे रात्री आठ ते नऊ वाजता बांबूच्या काठीच्या साहाय्याने झाडाच्या फांद्या हालवून खाली पाडावेत आणि ते हाताने गोळा करून रॉकेलमिश्रित पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा. हा उपाय प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांनी सामुदायिकरीत्या करणे गरजेचे आहे. तसेच जोपर्यंत जमिनीतून भुंगेरे निघतात तोपर्यंत हा कार्यक्रम चालू ठेवणे गरजेचे आहे.

प्रकाश सापळे लावावेत

प्रकाश सापळे किंवा पेट्रोमॅक्साचा वापर करूनदेखील प्रौढ भुंगेरे जमा करता येतात. हे प्रकाश सापळे किंवा पेट्रोमॅक्स सर्व शेतकऱ्यांनी शेतामधील घर, झोपडी, विहिरीजवळ किंवा झाडावर लावावेत. सापळ्यात जमा झालेले भुंगेरे नष्ट करावेत. हे सापळे साधारणपणे संध्याकाळी साडेसात ते साडेआठ या कालावधीत लावावेत. याप्रमाणे शेतकऱ्यांनी हुमणीच्या प्रौढ भुंगेऱ्यांचे सामूहिकरीत्या व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, असे आवाहन कीटकशास्त्र विभागाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Medical Negligence Alleged: Woman Dies After Hernia Surgery in Umarga
Massive Anti-Encroachment Drive: 400+ Structures Demolished in Garib Nagar
Prestigious State-Level Award for Principal Dr. Chandrasen Kothawale
NEET Paper Leak Probe: CBI Conducts Secret Investigation in Ambajogai
Marathi News Esakal
www.esakal.com