पोलिस कोठडीतील आरोपीचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

लातूर - लातूर एमआयडीसी पोलिस ठाण्यातील एका आरोपीचा रविवारी (ता. 15) रात्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्याचा मृत्यू स्वच्छतागृह धुण्याच्या ऍसिडमुळे झाला, की हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. या प्रकरणाचा तपास आता "सीआयडी'कडे देण्यात आला आहे. 

दीड महिन्यापूर्वी येथील एका ट्रॅव्हल बसला बार्शी परिसरात अडवून एका व्यापाऱ्याजवळील पाच लाख रुपये चोरांनी लुटले होते. या प्रकरणात पोलिसांनी गोवा, नागूपर येथून दोघांना अटकही केली होती. त्यानंतर गेल्या शुक्रवारी (ता. 13) गुजरातमधील नरेंद्रसिंह पृथ्वीसिंह हडियोळ (वय 40, गुजरात) याला अटक केली होती. आजपर्यंत त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. काल सकाळी तो स्वच्छतागृहात गेला होता. तेथे घाण असल्याने त्याने पोलिसांना ऍसिड मागितले. ऍसिड टाकून तो स्वच्छतागृह स्वच्छ करून परत कोठडीत आला. थोड्याच वेळात त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना रात्री त्याचा मृत्यू झाला आहे.

Web Title: marathwada latur murder