भीमा कोरेगाव: जालना शहरातही बंद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जानेवारी 2018

शहरातील व्यापाऱ्यांनी रॅली निघाल्यानंतर आपल्या दुकानाचे शटर खाली केले. याच दरम्यान शहरातील भोकरदन नाक्यावर अज्ञात व्यक्तींकडून बसवर दगडफेक करण्यात आली. या दोन घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळं शहरात शांतता आहे

जालना: भीमा कोरेगाव प्रकरणाचे पडसाद आज (मंगळवार) जालना शहरात उमटले. मंगळवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास शरातील तरुणांनी नूतन वसाहत येथील रॅली काढत शहर बंदची हाक दिली. तर शहरातील भोकरदन नका येथे अज्ञात व्यक्तीने बसवर दगड फेक केली. दरम्यान यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

कोरेगाव येथे सोमवारी (ता.1) झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी शहरातील सुमारे 100 तरुणांनी नूतन वसाहत येथून रॅली काढली. यावेळी शहरातील दुकान बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी तरुणांनी कोरेगाव येथील घटनेचा निषेध करत शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या.

दरम्यान शहरातील व्यापाऱ्यांनी रॅली निघाल्यानंतर आपल्या दुकानाचे शटर खाली केले. याच दरम्यान शहरातील भोकरदन नाक्यावर अज्ञात व्यक्तींकडून बसवर दगडफेक करण्यात आली. या दोन घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळं शहरात शांतता आहे. 

Web Title: marathwada news: agitation