बीड येथे घरातील नळांना येऊ लागले पाणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 मार्च 2018

बीड - थकीत वीज बिलामुळे पाणी योजनेचा वीजपुरवठा खंडित झाल्याने शहरातील पाणी वितरण व्यवस्था कोलमडली होती. त्यामुळे शहरातील बहुतांश भागात पाणीटंचाई निर्माण झाली होती; मात्र वितरण व्यवस्था सुरळीत होऊन निम्म्या अधिक भागातील घरांमध्ये पाणी आले आहे. दोन दिवसांत सर्व भागांत पाणी येईल. याबाबत ‘सकाळ’मधून सोमवारी (ता. २६) ‘बीड शहरात पाणीपुरवठा व्यवस्था कोलमडली’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते.

पालिकेकडील थकीत वीज बिलामुळे महावितरणने माजलगाव बॅक वॉटरचा वीजपुरवठा खंडित केल्याने दररोज दोन कोटी लिटर पाण्याचा तुटवडा निर्माण होऊन शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याचा परिणाम शहरातील सत्तर टक्के भागातील पाणी वितरण व्यवस्थेवर झाला होता. त्यामुळे माजलगाव बॅक वॉटर योजनेवर अवलंबून असलेल्या सत्तर टक्के भागात टंचाईच्या झळा बसत होत्या. योजनेवरील शहरातील बार्शी नाका, जालना रोडचा पश्‍चिम भाग, बार्शी नाका परिसराचा दक्षिण भाग, गांधीनगर, नाळवंडी नाका, गांधीनगर, तेलगाव नाका, संत नामदेवनगर, अंबिकानगर, शाहूनगर, जवाहर कॉलनी या भागात १२ ते १४ दिवस पाणी आले नव्हते. त्यामुळे पाण्यासाठी ओरड सुरू होती. लोकांना विकतचे पाणी घ्यावे लागत होते. दरम्यान, वीज जोडणी झाल्याने बार्शी नाका, धानोरा रोड येथील पाणी टाकीवरून पुरवठा असलेल्या भागात बुधवार आणि गुरुवारी पाणी सुटले.  शहरालगतच्या भागात शुक्रवारी व शनिवारी पाणी सुटणार आहे.

Web Title: marathwada news beed sakal news impact water