मुलींची छेडछाड करणाऱ्या क्‍लासच्या व्यवस्थापकास चोप 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

औरंगाबाद - औरंगाबादमधील खासगी क्‍लासमध्ये अनेक दिवसांपासून विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या तेथील शाखा व्यवस्थापक व प्रमुखाला युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी बेदम चोप देत तोडफोड केली. 

औरंगाबाद - औरंगाबादमधील खासगी क्‍लासमध्ये अनेक दिवसांपासून विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या तेथील शाखा व्यवस्थापक व प्रमुखाला युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी बेदम चोप देत तोडफोड केली. 

आकाशवाणीलगत असलेल्या खासगी क्‍लासमध्ये वैद्यकीय, जेईई, आयआयटी परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थिनी येतात. मात्र, येथील शाखा व्यवस्थापक शिवहरी वाघ व शाखाप्रमुख रोहित सूळ हे आम्हाला गेल्या वर्षभरापासून छेडत होते, असे त्रस्त विद्यार्थिनींनी सांगितले. विद्यार्थिनींना संपर्क क्रमांक मागणे, त्यांच्या दिसण्यावरून अश्‍लील बोलणे, टोमणे मारणे असे प्रकार ते दोघे करीत असत. एका विद्यार्थिनीने हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला. तिच्या भावाने युवा सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना कळविले. त्यानंतर थोरात, संजय हरणे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज दुपारी क्‍लासमध्ये जाऊन वाघ व सूळ यांना जाब विचारून तोडफोड केली. त्यानंतर त्यांना रस्त्यावर बेदम चोप दिला. पोलिस तेथे आल्यानंतर त्यांनी दोघांची सुटका करून त्यांना पोलिस ठाण्यात नेले. 

घटना पाहून पालक हादरले 

छेडछाडीच्या प्रकारानंतर नागरिकांनी शाखा व्यवस्थापक व प्रमुखाला झोडपले. त्याच वेळी मुलीला नीट' परीक्षेकरिता प्रवेश घेण्यासाठी एक पालक नगर जिल्ह्यातून आले होते. छेडछाडीचा प्रकार ऐकून ते अक्षरश: हादरले व त्यांनी क्‍लासमधून काढता पाय घेतला. या घटनेमुळे मुलींचे पालक चिंतित असून सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

Web Title: marathwada news crime