तलाठ्यासह दोघांचा जामीन फेटाळला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

शिराढोण - बनावट सातबारा बनवून जमीन खरेदी-विक्रीचा व्यवहार करून बनावट कागदपत्रांच्या आधारे बॅंकेचे कर्ज घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी तलाठ्यासह दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. जे. पाटील यांनी फेटाळला. शिराढोण शिवारातील सर्व्हे नंबर २०८ मधील एक हेक्‍टर ७९ आर जमीन २००९ मध्ये तत्कालीन तलाठी गुणवंत कुलकर्णी, मंडल अधिकारी महादेव टोपे यांनी सय्यद मोईजोद्दीन खुदमोद्दीन खतीब यांच्या नावाने दाखवून बनावट सातबारा तयार केला. 

ही जमीन २००९ मध्ये सय्यद निजामोद्दीन शमशोद्दीन खतीब यांना विक्री करण्यात आली. यानंतर सय्यद निजामोद्दीन खतीब यांनी फेरफार आधारे सातबाराची नोंद घेऊन बॅंकेचे ९७ हजार रुपये कर्ज घेतले. तसेच याच सातबाऱ्याच्या गटावर सय्यद ख्वाजा हाफीजोद्दीन खतीब यांच्या नावाने १६ आर क्षेत्र होते, त्यात तलाठी गुणवंत कुलकर्णी यांनी २८ आर क्षेत्र वाढवून ४४ आर केले. 

या नोंदीआधारे ख्वाजा खतीब याने शासनाचे पीक नुकसान अनुदान तसेच पीकविमा योजनेचा लाभ घेतला. ही बाब मूळ मालक दिनेश भाटीया यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तहसीलदार, कळंब यांच्याकडे मे २०१६ मध्ये तक्रार दिली. तहसीलदारांनी चौकशीनंतर बनावट नोंदी रद्द कराव्यात असे आदेश ऑक्‍टोबर २०१६ मध्ये दिले होते. याबाबत पोलिस अधीक्षकांकडेही भाटीया यांनी तक्रार केली होती. तलाठी गुणवंत कुलकर्णी यांच्यासह पाच जणांविरुद्ध १५ जुलै रोजी शिराढोण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

 याप्रकरणी २१ जुलै रोजी तलाठी गुणवंत कुलकर्णी आणि मोईजोद्दीन खतीब यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दिला होता. हा अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. जे. पाटील यांनी बुधवारी (ता. २६) फेटाळला. 

Web Title: marathwada news crime bail