उस्मानाबाद, बीडमध्ये दोन शेतकरी आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

उस्मानाबाद - बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना बुधवारी (ता. 26) घडल्या. 

कनगरा (ता. उस्मानाबाद) येथील शेतकरी बालाजी भैरवनाथ इंगळे (वय 35) यांनी शेतातील गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यावर खासगी, ट्रॅक्‍टरसाठी घेतलेले कर्ज होते. वडिलांच्या नावावरही बॅंकांचे कर्ज होते. कर्जफेडीसाठी त्यांनाच तोंड द्यावे लागत होते. ट्रॅक्‍टरचे हप्ते वेळेवर भरले जात नसल्याच्या विवंचनेतून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. 

बोरगाव बुद्रूक (ता. गेवराई) येथील शेतकरी छत्रभुज आण्णासाहेब नलावडे (वय 58) यांनी शेतात विष घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यावर बॅंकेचे चार लाखांचे पिककर्ज आहे. ते त्यांनी नवे-जुने केले होते. थकबाकीदार शेतकऱ्यांत येत नसल्याने त्यांना शासनाने केलेल्या कर्जमाफीचा लाभ मिळणार नव्हता. नापिकीमुळे कर्जफेड कशी करावी या विवंचनेत ते होते. त्यांनी सकाळी शेतात जावून विष घेतले. 

Web Title: marathwada news farmer suicide beed