गेवराई: ऊस वाहतूक करणारा ट्रक पलटी; चालक ठार

वैजिनाथ जाधव
रविवार, 25 मार्च 2018

अपघातात ट्रकचे पुढील दोन्ही टायर तुटल्यानंतर ट्रक मधील ऊस चालकाची केबिन तोडून ट्रकच्या पुढे पडला. मध्यरात्री घडलेली घटना रविवारी (ता. २५) सकाळी समोर आली. ट्रकमधील ऊस बाजूला काढल्यानंतर चालकाचा मृतदेह आढळून आला. 

गेवराई : ऊस वाहतूक करणारा ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी होऊन चालक ठार झाल्याची घटना तालुक्यातील खांडवी येथे शनिवार-रविवारच्या मध्यरात्री घडली. ज्ञानेश्वर माळी (वय २८, रा. टाकरवण, ता. माजलगाव) असे ठार झालेल्या चालकाचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की : टाकरवन (ता. माजलगाव) येथील फडतील ऊस तोडणी केल्यानंतर तो ट्रकमधून गढी (ता. गेवराई) येथील जय भवानी सहकारी साखर कारखान्यावर आणला जात होता. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 222 वरील खांडवी फाटा येथे रस्त्याच्या कडेला ऊसाने भरलेला ट्रक (क्रमांक एम. एच. 17 टी. 6394) पलटी झाला.  यामध्ये चालक ज्ञानेश्वर माळी जागीच ठार झाले.

अपघातात ट्रकचे पुढील दोन्ही टायर तुटल्यानंतर ट्रक मधील ऊस चालकाची केबिन तोडून ट्रकच्या पुढे पडला. मध्यरात्री घडलेली घटना रविवारी (ता. २५) सकाळी समोर आली. ट्रकमधील ऊस बाजूला काढल्यानंतर चालकाचा मृतदेह आढळून आला. 

Web Title: Marathwada news Gevrai truck accident one dead