चोरीचे मोबाईल विक्रीस आलेले दोघे अटकेत 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

औरंगाबाद - चोरीचे मोबाईल विक्रीसाठी आलेल्या दोघांना गुन्हेशाखेच्या पथकाने रविवारी (ता. 18) अटक केली. त्यांच्याकडून एकूण एक लाख रुपये किमतीचे 12 मोबाईल, टॅब पोलिसांनी जप्त केले. शेख अजीम ऊर्फ उस्मान शेख नाजीम (वय 28, रा. आजम कॉलनी, रोशन गेट) व फेरोजखान असमतखान दुर्राणी (वय 48, रा. कैसर कॉलनी, चंपाचौक) अशी संशयितांची नावे आहे. 

हे दोघे जण चोरीचे मोबाईल विक्रीसाठी जळगाव रस्त्यावरील हडको एन-11 येथे येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हेशाखेने तेथे सापळा रचून त्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतल्यानंतर आयफोन, टॅबसह बारा मोबाईल आढळले. त्यांना सिडको पोलिसांच्या ताब्यात देऊन अटक करण्यात आली. ही कारवाई सहायक निरीक्षक घनश्‍याम सोनवणे, पोलिस नाईक सुधाकर राठोड, विजयानंद गवळी, लालखॉं पठाण, योगेश गुप्ता, सिद्धार्थ थोरात, नंदलाल चव्हाण, धर्मराज गायकवाड, नितीन धुळे यांनी केली.

Web Title: marathwada news mobile crime aurangabad