‘इंद्रधनुष्य’मध्ये २० विद्यापीठांतील एक हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

परभणी - वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात पंधराव्या महाराष्ट्र राज्‍यआंतर विद्यापीठ युवक महोत्‍सव इंद्रधनुष्‍य स्‍पर्धेचे ता. पाच ते नऊ नोव्‍हेंबरदरम्‍यान  आयोजन करण्‍यात आले. यात राज्यातील २० विद्यापीठातील एक हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

परभणी - वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात पंधराव्या महाराष्ट्र राज्‍यआंतर विद्यापीठ युवक महोत्‍सव इंद्रधनुष्‍य स्‍पर्धेचे ता. पाच ते नऊ नोव्‍हेंबरदरम्‍यान  आयोजन करण्‍यात आले. यात राज्यातील २० विद्यापीठातील एक हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

महोत्सवाचे उद्‍घाटन विद्यार्थी कल्‍याण अधिकारी कार्यालयाच्‍या मैदानावर रविवारी (ता. पाच) सकाळी दहा वाजता परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांच्‍या हस्‍ते होणार असून कवी प्रा. इंद्रजित भालेराव यांची प्रमुख पाहुणे म्‍हणून उपस्थित रहातील. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलू राहणार आहेत. समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रम गुरुवारी (ता. नऊ) खासदार संजय जाधव यांच्‍या प्रमुख उपस्थित पार पाडणार आहे.

राज्‍यातील महाविद्यालयीन युवकांमधील कलागुणांना वाव मिळावा या हेतुने दरवर्षी स्‍पर्धेचे आयोजन राज्‍यपाल कार्यालयाच्‍या आदेशानुसार करण्‍यात येते, यावर्षी आयोजनाचा मान प्रथमच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठास प्राप्‍त झाला आहे. महोत्सव आयोजनाच्या तयारीचा आढावा राज्यपाल कार्यालयाने घेऊन प्रशासनाला सूचना केल्या आहेत. 

संगीत, नृत्य, साहित्य, रंगमंचीय, ललित कला अशा विविध २४ कलाप्रकारांत विद्यार्थी कलावंत आपली कला सादर करतील. स्‍पर्धेत राज्‍यातील कृषी व अकृषी अशा २० विद्यापीठातील एक हजार स्‍पर्धक विद्यार्थी व राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्‍पर्धा निरीक्षक सहभागी होणार आहे. विद्यापीठात स्‍पर्धेची जय्यत तयारी करण्‍यात येत असून कुलगुरू डॉ. व्‍यंकटेश्‍वरलू यांच्‍या मार्गदर्शनाखाली स्‍पर्धा यशस्‍वीतेसाठी विविध समित्‍यांचे गठण करण्‍यात आले आहे, अशी माहिती आयोजक शिक्षण संचालक डॉ. विलास पाटील व आयोजन सचिव विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ. महेश देशमुख यांनी दिली आहे.

Web Title: marathwada news parbhani student