आवकाळी पावसाचा गव्हाबरोबरच द्राक्ष, अंब्यांनाही फटका

विशाल अस्वार
बुधवार, 21 मार्च 2018

गव्हाचे पीक आडवे
पावसाबरोबरच जोराच्या वाऱ्यामुळे परिसरातील  गव्हाचे पीक आडवे झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचा गहू हुरड्यात, तर काही शेतातील गहू काढणीच्या अवस्थेत आहे, त्यामुळे गव्हाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले असून,पंचनामा करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

वालसावंगी : परिसरात पडलेल्या बेमोसमी वादळी पावसाचा फटका पिकांबरोबरच द्राक्षबागा व आंब्यांनाही बसला आहे. शेतकऱ्यांनी निसर्गापुढे आता हाथ टेकले आहे.

गव्हाचे पीक आडवे
पावसाबरोबरच जोराच्या वाऱ्यामुळे परिसरातील  गव्हाचे पीक आडवे झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचा गहू हुरड्यात, तर काही शेतातील गहू काढणीच्या अवस्थेत आहे, त्यामुळे गव्हाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले असून,पंचनामा करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

द्राक्षबागेला फटका:
ऐन काढणीवर आलेल्या द्राक्षबागेला पावसाचा तसेच वातावरण बदलाचा मोठा फटका बसला,अचानक आलेल्या पावसामुळे द्राक्षे खराब झाले अाहेत. त्यामुळे मिळेल त्या कवडीमोल भावाने द्राक्ष विक्री करावी लागेल.

कैऱ्याची मोठी पडझड:
वातावरण बदलामुळे तसेच कालच्या वाऱ्यामुळे  आंब्यांच्या झाडाखाली आज सकाळी छोट्या कैऱ्यांचा सडा पडलेला दिसला.

Web Title: Marathwada news rain affect farmer