जेमतेम साठ्यात पाणीपुरवठ्याची कसरत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

वालसावंगी - काही दिवसांपूर्वी परिसरात दोन दिवस दमदार पाऊस बरसला. या मूळ खरीप पिकांना जीवदान मिळाले. मात्र, जोरदार पावसाअभावी वालसावंगीसह अन्य दहा ते पंधरा गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या पद्मावती, तसेच शेलूद येथील धामना धरणात जेमतेम पाणीसाठा शिल्लक आहे. काही दिवस पाणीपुरवठा शक्‍य आहे.  

पावसाळ्याचे अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. सध्या परिसरात केवळ रिमझिमच पाऊस पडत आहे. अजूनपर्यंत मुसळधार, संततधार पाऊस पडला नाही, धरण अद्यापही कोरडेच असल्याने गावाला पाणीपुरवठा पुढे होईल कसा? हा यक्षप्रश्न ग्रामपंचयातीला पडला आहे.

मागच्या वर्षी पद्मावती धरणात, तसेच धामना धरणात शंभर टक्के पाणीसाठा होता. अगदी दोन वर्षे पाणीपुरवठा करता येईल एवढे पाणी धरणात होते. मात्र, झपाट्याने दोन्ही धरणांतून पंप लावून पाणी उपसा झाला, सांडव्याद्वारे पाणी गुपचूप सोडण्यात आले. यामुळे झपाट्याने पाणीसाठा कमी झाला. वारंवार ग्रामपंचयात कार्यालयाने या संदर्भात सरकारी दप्तरला निवेदने दिली; मात्र काहीच उपयोग झाला नाही. आता परिसरात धामना नदीत केवळ तुंबलेले पाणी आहे, तर लेंडी नदी अजूनही कोरडीच आहे, पाझर तलावात देखील जेमतेम पाणीसाठा आहे.  

शेतातच मुरले पाणी
या वर्षी उन्हाळ्यात ऊन चांगलेच तापल्याने जमिनी खूप भेगाळलेल्या होत्या, त्यातच पावसाळ्याचा पाऊससुद्धा रिमझिम बरसत असल्याने जमिनीत पाणी मुरत नव्हते. मागील काही दिवसांपूर्वी पाऊस चांगला पडला; मात्र ते पूर्ण पाणी जमिनीतच झिरपले, ते शेतातून वाहिले नाही. त्यामुळे नदी-नाल्यांना पाणी मिळाले नाही.

पाण्याचा काटकसरीने वापर
जर येणाऱ्या काही दिवसांत पाऊस बरसला नाही तर हंडाभर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर येणार आहे. गावाला टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागेल. त्यामुळे पावसाळ्यातच पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे ग्रामस्थांना सांगण्याची वेळ ग्रामपंचायतींवर आली आहे.

रब्बी पिके तरणार कशी?
खरीप पिकांना पाणी देता देता शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले, रिमझिम पावसावर कशीबशी पिके उभी राहिली. आता शेतीचे उत्पादन घटणार आहे, त्यात पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे विहिरींची पाणीपातळी खालावली. त्यामुळे रब्बी पिकांना पाणी देणार कोठून हाही प्रश्न आहे, खरीप पिकांप्रमाणे रब्बीला देखील पावसाअभावी फटका बसणार आहे.

Web Title: marathwada news water