esakal | 'कोट्यवधीचा हिशोब नको, मराठवाड्याला फक्त ५०० व्हेंटीलेटर द्या', चंद्रकांत खैरेंचा फडणवीसांना टोला
sakal

बोलून बातमी शोधा

chandrakant khaire on devandra fadanvis

मराठवाड्यातील व्हेंटिलेटर व ऑक्सीजन टंचाई विषयी अनेकजण आवाज उठवत आहेत

'कोट्यवधीचा हिशोब नको, मराठवाड्याला फक्त ५०० व्हेंटीलेटर द्या', चंद्रकांत खैरेंचा फडणवीसांना टोला

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : कोरोनासाठी मुख्यमंत्री सहाय्य योजनावर बंधन आणण्यात आली. कंपन्या व उद्योजकांतर्फे  कोरोनाच्या संसर्ग उपाय-योजना कमी करण्यासाठी देण्यात येणारी सर्व मदत पंतप्रधान रिलीफ फंडात टाकावी असे सांगण्यात आले. महाराष्ट्रातून हजारो कोटी रुपयांचा निधी या रिलीफ फंडात अनेकांनी दिले आहे. या हजारो कोट्यवधींचा हिशोब नको, फक्त मराठवाड्याला ५०० वेंटिलेटर द्या, अशी मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली. यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यावेत असा टोलाही लगावला.

मराठवाड्यातील व्हेंटिलेटर व ऑक्सीजन टंचाई विषयी अनेकजण आवाज उठवत आहेत. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. विरोधी पक्ष नेत्यांना उत्तर देताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले की, महाराष्ट्रातील अंबानी, आदानी, विप्रोसह अनेकांनी केंद्र सरकारच्या पंतप्रधान रिलीफ फंडात हजारो कोटींचा निधी जमा केला आहे. या बदल्यात केंद्र सरकारने महाराष्ट्राला काय दिले असा सवालही खैरे यांनी उपस्थित केला. तर राज्याला २० हजार कोटी रुपये दिल्याची विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस सांगत आहेत, मात्र ते पैसे कसे दिले आहेत ते त्यांनी सांगावेत, असा खोचक टोलाही  खैरेंनी फडणवीसांना लगावला.

Corona Impact| कोरोनाचा एसटीला फटका; उत्पन्न घटले

महाराष्ट्रातून पंतप्रधान रिलीफ फंडात गेलेल्या निधीतून मराठवाड्याला ५०० व्हेंटीलेटर द्यावेत. यातील दोनशे व्हेंटीलेटर औरंगाबादला द्यावेत. यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना तर बोलणारच आहोत मात्र, विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी पुढाकार घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगून ही मदत महाराष्ट्राला मिळवून द्यावीत. हे पुण्याचे काम फडणवीसांनी करावीत त्यांच्याकडे विनंती आहे आसेही खैरे म्हणाले.

Coronavirus| चिंताजनक! बालकांमध्ये प्रमाण वाढले; आठ दिवसांत ७५ बालकांना बाधा

केंद्राकडे  महाराष्ट्रातून जे पैसे निधी स्वरूपात गेले आहेत ते परत द्यावेत. ती न दिल्यामुळे आज राज्यात अडचणी वाढल्या आहेत. ही मदत मिळवून दिली तर सर्वांचे प्राण वाचतील. यामूळे आता  पुढाकार घेऊन राज्याला व्हेंटिलेटर देण्यासाठी पंतप्रधानाकडे बोलावे असे ही शिवसेना नेते खैरे म्हणाले.

वाळूज परिसरात घरफोडी, सोन्या-चांदीच्या दागिण्यांसह रोख रक्कमची चोरी

मेल्ट्रोन प्रमाणे इतर हॉस्पिटलमध्ये  सुविधा व्हावी-

ऑक्सिजन प्लांटसाठी मेल्ट्रोन हॉस्पिटलप्रमाणे इतर हॉस्पिटलमध्ये ही अशा प्रकारच्या सुविधा असणे गरजेची आहे. यासाठी लागणारा निधी केंद्र सरकारने दिला पाहिजे. असेही खैरे म्हणाले.

loading image