

Marathwada Rain Forecast
esakal
परभणी : मराठवाड्यात आजपासून (ता.२०) पुढील तीन दिवस तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान केंद्राने वर्तवला आहे.
संपूर्ण मराठवाड्यात पावसाने मोठा ताण दिला आहे. बहुतांश ठिकाणी महिना, सव्वा महिन्यानंतर १७ सप्टेंबर रोजी कमी अधिक स्वरूपाचा पाऊस झाल्याने राहिलेल्या पिकांना जिवदान मिळाले. असे असले तरी छोटी-मोठी धरणे अद्यापही तहानलेली आहेत. आता परतीचा पाऊस सुरू झाला असून, कृषी विद्यापीठाने प्रादेशिक हवामान केंद्रातून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार, आपला अंदाज वर्तवला आहे.
त्यानुसार, आज, रविवारी (ता. २०) परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. सोमवारी (ता. २१) छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली जिल्ह्यात, मंगळवारी (ता. २२) नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यात पुढील ४८ तासांत तापमानात एक ते दोन अंशाने वाढ होऊ शकते. नंतर पुन्हा दोन ते चार अंशांनी घट होऊ शकते. त्यानंतर मात्र तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. विस्तारीत अंदाजानुसार, २० ते २४ सप्टेंबर व २५ सप्टेंबर ते एक ऑक्टोबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.