Marathwada Yellow Alert : मराठवाड्यात दीर्घ खंडानंतर पावसाच्या सरी ; ठिकठिकाणी हजेरी; उन्हाच्या झळा, उकाड्यापासून काहीसा दिलासा

Rain Returns to Marathwada After 50-Day Break : हिंगोली, परभणी, धाराशिव, जालना आणि नांदेडमध्ये पावसाची हजेरी लागली असून नांदेडला २३ ते २६ सप्टेंबरदरम्यान येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Marathwada Rain

Marathwada Rain

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर : सुमारे पन्नासहून अधिक दिवस पाठ फिरविलेल्या पावसाने बुधवारी (ता. २३) मराठवाड्याच्या विविध भागांत हजेरी लावली. हलका ते मुसळधार असे त्याचे स्वरूप होते. ‘ऑक्टोबर हीट’सदृश स्थिती, वाढलेल्या उकाड्याच्या पार्श्वभूमीवर हा पाऊस काहीसा दिलासा देऊन गेला.

हिंगोली शहर परिसरात आज जोरदार पावसाने हजेरी लावली. औंढा नागनाथ शहरासह तालुक्यात एक तास मुसळधार पाऊस झाला. दोन-तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात उन्हाची तीव्रता वाढली होती. उकाडाही जाणवत होता. दुपारनंतर वातावरणात बदल झाला आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरवात झाली.

Marathwada Rain
Gadchiroli Collector : जिल्हाधिकाऱ्यांनी दुचाकीने केला दौरा दुर्गम भागातील रस्ते, पूल, आरोग्य, शिक्षणासह अन्य सुविधांची पाहणी

मानवत, सेलूत सरी

परभणी जिल्ह्यातील मानवत येथे सायंकाळी सोसाट्याचा वारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. सेलू शहरासह वारा, विजांच्या कडकडाटासह अधूनमधून पाऊस सुरू होता. धाराशिव जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी १६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आठही तालुक्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. उमरगा व लोहारा तालुक्यांत सर्वाधिक पाऊस नोंदला गेला.

Marathwada Rain
Ballarpur Hospital Incident : प्रसूतीदरम्यान मातेसह बालकाचा मृत्यू बल्लारपुरातील घटना; पोलिसांच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती नियंत्रणात

जालना शहरात हजेरी

मोठ्या खंडानंतर जालना शहरात पावसाने हजेरी लावली. सायंकाळी अचानक आकाशात ढगांची गर्दी झाली. त्यानंतर सुमारे अर्धा तास शहरात पावसाची रिपरिप सुरू होती.

नांदेड शहरासह जिल्ह्यात दुपारनंतर पावसाच्या सरी कोसळल्या. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी पाच मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, मुंबईतील प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राच्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी २३ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या कालावधीत तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पाऊस होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com