Ballarpur Hospital Incident : प्रसूतीदरम्यान मातेसह बालकाचा मृत्यू बल्लारपुरातील घटना; पोलिसांच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती नियंत्रणात

Police Record Accidental Death After Hospital Incident : पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून शवविच्छेदन व वैद्यकीय अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.
Ballarpur Hospital Incident

Ballarpur Hospital Incident

esakal

Updated on

बल्लारपूर : शहरातील एका नामांकित रुग्णालयात प्रसूतीदरम्यान माता आणि नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. २३) घडली. घटनेनंतर रुग्णालय परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. ठाणेदार विपिन इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. नीलम कुमारी सिंह (वय ३४) असे मृत महिलेचे नाव आहे. मृत महिलेचे पती रणधीरकुमार सिंह यांच्या तक्रारीवरून बल्लारशाह पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

मृतदेह बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयामार्फत चंद्रपूर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल तसेच जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. रणधीर कुमार सिंह हे मध्य रेल्वेच्या बल्लारशाह स्थानकात लोको पायलट म्हणून कार्यरत आहेत. नीलम कुमारी यांच्यावर गर्भावस्थेपासून संबंधित रुग्णालयात नियमित उपचार सुरू होते.

Ballarpur Hospital Incident
Purandar Airport: पुरंदर विमानतळाच्या जागेला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा धक्का; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना २२ सप्टेंबर रोजी दुपारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २३ सप्टेंबरच्या पहाटे सुमारे चार वाजता नीलम कुमारी यांना प्रसूतीकळा सुरू झाल्यानंतर प्रसूती प्रक्रिया करण्यात आली. नैसर्गिक प्रसूतीनंतर सुमारे एका तासाने नवजात बालकाचा मृत्यू झाला. त्यानंतर काही वेळातच नीलम कुमारी यांचाही मृत्यू झाला. नवजात बालकाच्या गळ्याभोवती नाळ दोनदा गुंडाळली गेल्याने त्याला पुरेसा ऑक्सिजन मिळू शकला नाही.

त्यामुळे प्रसूतीदरम्यान बालकाचा मृत्यू झाला. त्यानंतर नीलम कुमारी यांचा रक्तदाब अत्यंत कमी झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाली. परिस्थिती लक्षात घेऊन चंद्रपूर येथून दोन तज्ज्ञ डॉक्टरांना तातडीने पाचारण करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांना वाचवता आले नाही, असे रुग्णालयातील डॉक्टरांचे म्हणणे आहे. उपचारादरम्यान रुग्णालयाकडून कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा झालेला नसल्याचा दावा संबंधित डॉक्टरांनी केला आहे. या घटनेचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आणि वैद्यकीय अहवालातून स्पष्ट होणार आहे.

Ballarpur Hospital Incident
Wardha Well Incident : दोन चिमुकल्या बहिणींचा विहिरीत बुडून मृत्यू साटोणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर

महिलेला प्रसूतीकळा येण्यासाठी इंजेक्शन देण्यात आले. बाळाच्या गळ्यात दुहेरी फास असल्यामुळे प्रसूतीदरम्यान बाळाचा मृत्यू झाला. त्याच वेळी आपल्या बाळाचा मृत्यू झाल्याचे महिलेला कळल्याने तिची प्रकृती गंभीर झाली. तिला वाचविण्यासाठी खूप प्रयत्न केले परंतु तिचा ही मृत्यू झाला. - डॉ. मंजुषा कल्लुरवार, स्त्रीरोगतज्ज्ञ, बल्लारपूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com