दबक्‍या पावलाने हुकूमशाही येते आहे - डॉ. ऋषिकेश कांबळे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 डिसेंबर 2018

कवी अटलबिहारी संमेलननगरी, (उदगीर) - आपल्या आजूबाजूचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय पर्यावरण चिंतीत करणारे आहे. विचारवंतांचे होणारे खून, कपडे- खाण्यावर घातले जाणारे निर्बंध, जात-धर्माच्या नावावरून पसरवला जाणारा तेढ ही लोकशाही नसून दबक्‍या पावलांनी येणारी हुकूमशाहीच आहे, अशा शब्दांत मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी चिंता व्यक्त केली. हुकूमशाहीचे रूप पुतना मावशीसारखी असते. ती आकर्षक वाटते; पण विष ओकते, असेही ते म्हणाले.

मराठवाडा साहित्य परिषदेच्या उदगीर शाखेतर्फे चाळिसाव्या तीनदिवसीय मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन साहित्यिक डॉ. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रविवारी (ता. २३) झाले. या वेळी मराठवाड्यातील साहित्य-संस्कृतीवर प्रकाशझोत टाकणाऱ्या ‘सुंबरान’ या स्मरणिकेचे प्रकाशन झाले. डॉ. कांबळे यांनी अध्यक्षीय भाषणात समाज व्यवस्था, राज्यकर्ते, लेखकांचा उद्देशून परखड विचार मांडले. ते म्हणाले, की आपल्या आजूबाजूला भय नाही असे वारंवार सांगितले जात आहे. मग इतके भयकंपित वातावरण का घोंघावत आहे, देशाचे सामाजिक स्वास्थ्य बिघडल्यासारखे का वाटत आहे, अनेक समाजसमूहाला असुरक्षित का वाटत आहेत, याचा नीट विचार झाला पाहिजे. माणूस संपविण्याचे कटकारस्थान चालू आहे. माणसे सज्ञान होऊ नयेत, ती अंधश्रद्धेच्या कोंडवाड्यात राहावीत असे प्रयत्न सुरू आहेत.

मराठवाडा वेगळा करा
‘मराठवाड्याला वेगळ्या राज्याचा दर्जा द्या, मराठवाडा  राज्य झाले पाहिजे’ अशा घोषणा साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटन सोहळ्यात काही कार्यकर्त्यांनी दिल्या. संमेलनाध्यक्ष डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी ‘वेगळे झाल्यावर कसे उभे राहाल’, असा खडा सवाल उपस्थित केला.उद्‌घाटनानंतर डॉ. कांबळे अध्यक्षीय भाषणासाठी उठले असता काही कार्यकर्त्यानी व्यासपीठावर येऊन कांबळे यांचा ध्वनिक्षेपक हाती घेत या घोषणा दिल्या.

Web Title: Marathwada Sahitya Sammelan