Marathwada : कळंब मधील गोडाऊन फोडून सूपारी चोरी प्रकरणात दोन चोरट्यांना अटक

अवघ्या चोवीस तासात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने चोरीच्या गुन्ह्यातील प्रकरणाचा छडा लावला आहे
Marathwada news
Marathwada newsesakal

कळंब : शहरातील तांदूळवाडी रस्त्यावरील डिकसळ येथील गोडाऊन फोडून त्यातील चोरट्यांनी १६ लाख ६० हजार रुपये किंमतीचे सुपारीचे ४५ पोते चोरून नेहणाऱ्या चोरट्यांना जेरबंद करण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाला यश आले आहे. शनिवार (ता.२) चोरीची घटना घडली होती.याप्रकरणी पानमटेरियलचे प्रसिद्ध व्यापारी महादेव घुले यांच्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.अवघ्या चोवीस तासात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने चोरीच्या गुन्ह्यातील प्रकरणाचा छडा लावला आहे.

Marathwada news
Makeup Tips : हिवाळ्यातला मेकअप म्हणजे चेहऱ्याला पिठ लावल्यासारखंच दिसतं? या स्टेप्सनी मिळवा मेकअपचा खरा ग्लो!

पोलिसांनी सांगितले की,शहरातील दत्तनगर भागातील महादेव घुले यांच्या मालकीचे तांदुळवाडी रस्त्यावर रूनवाल बिल्डिंग जवळ गोडाऊन आहे. या गोडाऊन सुपारीचे पोते ठेवण्यात आले होते.शुक्रवारी सायंकाळी गोडाऊन बंद केले होते. शनिवारी सकाळी घुले यांनी गोडाऊन उघडले असता चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनच्या शटरचे कुलूप तोडून गोडाऊन मधील सुपारीचे ४५ पोते चोरून नेले. याप्रकरणी पोलिस ठाण्यात या चोरीच्या प्रकाराची नोंद झाली होती.

गुन्ह्याच्या तपास दरम्यान पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे,सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश पवार, पोलीस उपनिरीक्षक संदीप ओहोळ, पोलीस हावलदार औताडे,जानराव, फरहान पठाण,जाधवर, समाधान वाघमारे, हुसेन सय्यद, भोसले या पथकाने शहरातील कल्पनानगर, पारधी वस्तीवर छापा टाकून शंकर मच्छिंद्र काळे, श्रीकांत उर्फ बबलु बापु पवार ताब्यात घेवून चौकशी केली असता,चोरून नेहलेले ४५ सुपारीच्या पोत्यापैकी २३ पोते असल्याचे सांगितले.दरम्यान या दोघांच्या ताब्यातून सुपारीचे २३ पोते,सोनालिका ट्रॅक्टर हेड क्र एमएच १३ BR २५८७ असा एकुण ९ लाख ९५ हजार १७५ रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com