वामनदादांच्या गीतांमुळे विद्यापीठाला दहा कॉपीराइट

वामनदादांच्या गीतांमुळे विद्यापीठाला दहा कॉपीराइट

औरंगाबाद  - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार राज्याच्या कानाकोपऱ्यांत गीतांच्या माध्यमातून पोचविणारे लोककवी, भीमशाहीर वामनदादा कर्डक यांच्या लेखणीतून साकारलेल्या अजरामर भीमगीतांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला दहा कॉपीराइट (स्वामित्व हक्क) मिळवून दिले आहेत. विद्यापीठाच्या संगीत विभागाने ‘गीत भीमायन’ हा महत्त्वाकांक्षी संगीतमय उपक्रम हाती घेतला आहे. यामध्ये सुरेश वाडकर, रवींद्र साठे, कविता कृष्णमूर्ती, सावनी शेंडे, शुभा जोशी यांनी गायलेल्या गीतांना कॉपीराइट मिळाले आहेत. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्त विद्यापीठाचे कुलगुरू बी. ए. चोपडे यांच्या संकल्पनेतून ‘गीत भीमायन’ आकाराला आले. वामनदादा कर्डक यांची गाणी रागदारीमध्ये स्वरबद्ध करण्याचे आव्हान संगीत विभागाचे समन्वयक व स. भु. कला महाविद्यालयाचे संगीत विभागप्रमुख डॉ. संजय मोहड यांनी पेलले आहे. ‘गीत भीमायन’मध्ये पद्मश्री हरिहरन, पद्मश्री कविता कृष्णमूर्ती, पंडित सुरेश वाडकर, पंडित रवींद्र साठे, पंडित रघुनंदन पणशीकर, आरती अंकलीकर, सावनी व बेला शेंडे यांनी गाणी गायली आहेत. गाण्यांचे संगीत संयोजन प्रख्यात संगीतकार नरेंद्र भिडे यांनी केले आहे. आतापर्यंत यातील ५० गाण्यांचे ध्वनिमुद्रण पूर्ण झाले आहे. बौद्धिक संपदा हक्क कार्यालयाकडून विविध गाण्यांना कॉपीराइट प्रदान करण्यात आल्याचे डॉ. मोहड यांनी सकाळशी बोलताना सांगितले. \

‘गीतरामायण’च्या धर्तीवर वामनदादांच्या यांच्या दहा हजार गीतांपैकी शंभर गीतांची निवड करून महामानवाचे जीवनचरित्र या संगीतमय कलाकृतीतून उभारण्याचा कुलगुरू डॉ. चोपडे यांनी महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. यासाठी मी २१ वर्षांपासून केलेली संगीत साधना फळाला आली. परफॉर्मिंग आर्ट प्रकारात प्रथमच वामनदादांच्या निमित्ताने कॉपीराइट मिळाले. 
- डॉ. संजय मोहड, संगीत दिग्दर्शक, गीत भीमायन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com