ताडकळस - बालाजी रुद्रवार मारहाणी प्रकरणी येथील बाजारपेठ बंद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 सप्टेंबर 2018

ताडकळस - शिवसेनेच्या पक्षाचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी ता.23 सप्टेंबर रोजी परभणी येथे बोलावून ताडकळस ता.पुर्णाचे शहराध्यक्ष बालाजी रुद्रवार याना केलेल्या मारहाणीच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी ताडकळस येथील बाजारपेठ ता. 24 सप्टेंबर रोजी सकाळ पासुनच बंद करण्यात आली. या घटनेने शिवसेना अंतर्गत असलेल्या सुप्त वादाचे राजकारण रस्त्यावर आले.

येथील पोलिस ठाण्यात दिलेल्या निवेदनात खासदार बंडू जाधव यानी परभणीला त्याच्या निवासस्थानी बालाजी रूद्रवार याना बोलावून घेत भ्याड हल्ला केल्याचे नमुद केले आहे.या घटनेचा निषेध म्हणून ताडकळस बंद ठेवण्यात येणार असल्याचे निवेदनात सागितले आहे. त्यानुसार सकाळ पासूनच ताडकळस बंद असल्याने बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत आहे. बालाजी रूद्रवार हे ताडकळसचे शिवसेना शहर प्रमुख आहेत. खासदार संजय जाधव व आमदार डॉ. राहुल पाटील या शिवसेना नेत्यातील वैमनस्य सर्वश्रुत आहे. गाव पातळीपर्यंत शिवसेने अंतर्गत असलेला वाद उफाळत असल्याचे या मारहाण प्रकरणाने समोर आले आहे.

Web Title: The market closes in Balaji Rudwar case