बंदचे आदेश अन् भरला आठवडे बाजार

विनोद आपटे
शुक्रवार, 10 एप्रिल 2020


देशावर उद्भवलेल्या या संकटाचा नागरिकांना आता कुठलेच गांभीर्य राहीलेले नसून जो-तो अतिशय बेजवाबदारपणे वागत  काहीच कामे नसतानाही घराबाहेर पडू लागले आहेत. तर यांना शिस्त व कोरोना वायरसचे गांभीर्य सांगण्यातच पोलिस प्रशासनाची मात्र चांगलीच दमछाक होत आहे. तर नागरिकांच्या बेजबाबदार वागणुकीमुळे शहरासह परीसरात संचार बंदीच्या आदेशालाच केराची टोपली दाखविण्यात आली आहे. 

मुक्रमाबाद, (ता.मुखेड, जि. नांदेड) ः ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासन आवश्यक त्या उपाय योजना राबवित असून कोरोना या आजारातून नागरिकांना मुक्ती मिळावी जिवीत हानी होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय घेतला जात आहे. म्हणून देशासह राज्यात संचार बंदी लागु करण्यात आली आहे. परंतु मुक्रमाबाद शहर याला अपवाद ठरला असून लॉक डाऊन आदेशाची पायमल्ली करत पोलिस प्रशासनाच्या नाकावर टिच्चून मुक्रमाबाद येथील शुक्रवारचा आठवडी बाजार भरविण्यात आला. 

 

हेही वाचा - ​ ‘भाजीपाला थेट ग्राहकांच्या दारी’

देशावर उद्भवलेल्या या संकटाचा नागरिकांना आता कुठलेच गांभीर्य राहीलेले नसून जो-तो अतिशय बेजवाबदारपणे वागत  काहीच कामे नसतानाही घराबाहेर पडू लागले आहेत. तर यांना शिस्त व कोरोना वायरसचे गांभीर्य सांगण्यातच पोलिस प्रशासनाची मात्र चांगलीच दमछाक होत आहे. तर नागरिकांच्या बेजबाबदार वागणुकीमुळे शहरासह परीसरात संचार बंदीच्या आदेशालाच केराची टोपली दाखविण्यात आली आहे. मुक्रमाबाद येथील दोन दिवसीय शुक्रवारचा मोठा आठवडी बाजार भरत असतो. या बाजारला मराठवाड्यासह तेंलगणा, कर्नाटक राज्यातील व आंध्र प्रदेशातून हजारो नागरिक येत असतात. 

 

नागरिकांचे ठिकठिकाणी जत्थे
कोरोना या आजाराचा विळाखा वाढत असल्यामुळे सुरक्षितेच्या कारणामुळे येथील आठवडे बाजार हा पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. पण या आदेशालाच मुक्रमाबाद येथील व्यापाऱ्यांनी हारताळ फासत आपली दुकाने चालू ठेऊन दैनंदिन व्यव्हार चालू ठेवला. तर यात भर म्हणून आठवडी बाजारही मोठा भरविण्यात आला. या वेळी कुठलेच सुरक्षित अंतर ठेवण्यात आलेले नव्हते की, कोणताही व्यापारी व नागरिक हे, तोंडाला मास्क घातलेला घालून बाजारात आला नसल्यामुळे कोरोनाला अधिक बळ मिळत आहे. तर परवानगी नसतानाही आजचा आठवडी बाजार मोठा भरल्यामुळे शहरात पोलिस प्रशासन आहे की नाही? असा प्रश्न येथील सामान्य नागरिकांना पडलेला आहे. तर भाजीपाला व जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या नावावर मोठ्या प्रमाणात नागरिकांचे ठिकठिकाणी जत्थे पहावयास मिळत आहेत.

 

बँकेसमोर लागलेल्या रांगेतही सोशल डिस्टंसिंगचा फज्जा
या सह शहरातील बँकेसमोर लागलेल्या रांगेतही सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडताना दिसत आहे. शहरासह ग्रामीण भागातही अशीच परिस्थिती पहावयास मिळत असल्याने पोलिसांची अपुरी संख्या व परिसर व्याप्ती मोठी असल्याने पोलिसांवर मोठा तान येत आहे. आजही ग्रामीण भागातील लोक रस्त्यावर, चौकात, समाज मंदिरात समूहाने वावरतांना दिसत आहेत. तर आता पोलिस प्रशासन हे विनाकारण बाहेर फिरणाऱ्या झुंबड बाजांना समज देण्याऐवजी त्यांच्या विरोधात कठोर पावले उचलून कारवाई करण्याची आता खरी वेळ आलेली आहे. असे केले तरच लॉक डाऊनचा खरा हेतू साद्य होईल, अन्यथा लॉक डाऊन हा नावालाच राहणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Market opens in Mukramabad village, nanded news