उमरग्यात विवाहितेने आई व प्रियकराच्या मदतीने पतीचा केला खून

पती - पत्नीच्या नात्याला कलंकित घटनेने शहरात संताप
Osmanabad Crime News
Osmanabad Crime Newsesakal

उमरगा (जि.उस्मानाबाद) : प्रियकरासोबतच्या अनैतिक संबंधास अडसर ठरणाऱ्या पतीचा, पत्नीने वयोवृद्ध आई व प्रियकाराच्या मदतीने क्रूरपणे खून केल्याची घटना शहरातील काळे प्लॉटमध्ये शनिवारी (ता.२१) मध्यरात्रीनंतर घडली. दरम्यान या प्रकरणी मृताची  पत्नी, सासू व पत्नीच्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून रविवारी (ता.२२) रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या बाबतची प्राथमिक माहिती अशी कि, उमरगा (Umarga) येथील काळे प्लॉट भागात सिद्धू शिवराज पवार (वय ३८) हा रिक्षा चालक आपल्या पत्नी, दोन मुले व वडिलासह राहत होता. दरम्यानच्या काळात आरोपी पत्नी ज्योती व धनराज एकनाथ सुरवसे (वय ४८) यांचे अनैतिक संबंध असल्याची माहिती मृत सिद्धु यास समजली. (Married Woman Killed Her Husband With Help Of Mother And Lover In Umarga Of Osmanabad)

Osmanabad Crime News
वाढलेल्या वजनावर राज ठाकरे म्हणाले, "शिव्या खातो म्हणून..!"

शनिवारी रात्री धनराज घरात दिसल्याने सिद्धूचा संशय वाढला. अनैतिक संबंधास अडसर होणाऱ्या पतीचा काटा काढण्याच्या उद्देशाने शनिवारी रात्री उशीरा राहत्या घरी ज्योती सिद्धू पवार (वय ३०), मृताची सासू शकुंतला महादेव जाधव (६५ रा. होळी, ता. लोहारा) व प्रियकर धनराज सुरवसे (४८ रा. काळे प्लॉट, उमरगा) यांनी सिद्धूचा तोंड व गळा दाबून खून केला, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी रविवारी सकाळी गल्लीतील नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती कळविली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. परिस्थिती संशयास्पद असल्याने पोलिसांनी आरोपींना तात्काळ ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. या प्रकरणी शिवराज पवार यांच्या फिर्यादीनुसार पोलीस ठाण्यात गुन्हा (Osmanabad Crime Update) दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती. पोलीस निरीक्षक मनोजकुमार राठोड तपास करीत आहेत. दरम्यान मृत सिद्धू पवार यांचे शवविच्छेदन झाल्यावर संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Osmanabad Crime News
अनैतिक संबधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने केला प्रियकराच्या मदतीने खून

श्वानपथकाने शोधला आरोपी !

श्वानपथकान आरोपीचा माग काढत असताना पोलिसांनी बोलावलेला शासकीय पंचच आरोपी ठरल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. श्वानपथक आरोपी धनराज यांच्या पादत्राणे जवळच घुटमळत होते तेव्हा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com