

Parbhani Crime
sakal
पाथरी (जि. परभणी) : पती, दोन अपत्यांना सोडून प्रियकरासोबत लग्न करण्याच्या उद्देशाने घरातून निघून गेलेल्या महिलेच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून घाटात फेकून दिल्याची धक्कादायक घटना दोन आठवड्यानंतर बुधवारी (ता.१७) उघडकीस आली. खून करणारा प्रियकर फरारी असून पाथरी पोलिस त्याचा शोध घेत आहेत.