सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

प्रल्हाद कांबळे
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

नांदेड : सासरच्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेनी किटक नाशक प्राशन करून आत्महत्या केली. या प्रकरणी पतीसह सासरच्या नऊ जणांवर माहूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना धानोरा दीघडी (माहूर) येथे बुधवारी (ता. 22) सायंकाळी घडली होती. 

माहूर तालुक्यातील धानोरा दीघडी येथे राहणारी विवाहिता रंजना कांबळे (वय 33) हिला पतीसह सासरची मंडळी त्रास देत असे. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन पती आनंद कांबळे हा मारहाण करीत असे. एवढेच नाही तर तिला तो मारहाण करून उपाशी पोटी टेवत. तसेच लग्नात काही दिले नसल्याने आता पैसे घेऊन ये म्हणून तिचा मानसिक व शारिरक छळ सुरू झाला. अखेर या त्रासाला कंटाळून पिडीत विवाहिता रंजना आनंद कांबळे यांनी बुधवारी (ता. 22) सायंकाळी पाचच्या सुमारास आपल्या राहत्या घरी किटकनाशक प्राशन केले. यातच तिचा मृत्यू झाला. अमरदीप प्रल्हाद दामोदर यांच्या फिर्यादीवरुन माहीर ठाण्यात पती आनंद कांबळे, शिवाजी कांबळे, जनार्धन कांबळे, शांताबाई कांबळे, धम्मपाल कांबळे, कोयल कांबळे, सुरेश खंदारे आणि आशा खंदारे यांच्याविरूध्द हुंडाबळी व आत्महत्येस परावृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. तपास पोलिस उपनिरीक्षक घोडके हे करीत आहेत.

Web Title: married woman suicide due to domestic violence