विवाहितेची विहिरीत उडी मारून आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

गंगापूर - हुंड्याच्या जाचाला कंटाळून मांजरी (ता. गंगापूर) येथील विवाहितेने सोमवारी (ता. 15) विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. स्वाती मनोहर कोळसे (वय 28) असे मृत महिलेचे नाव आहे. फिर्यादी गयाबाई लक्ष्मण मोरे यांच्या तक्रारीवरून येथील पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता.16) पती, सासू, सासरा, दीर यांच्यासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यात आरोपी मनोहर मुरलीधर कोळसे, लताबाई मुरलीधर कोळसे, मुरलीधर कोळसे, पोपट मुरधीर कोळसे (सर्व रा. मांजरी), छाया भाऊसाहेब बनकर, इशाखा अरुण गायकवाड, अरुण गायकवाड, भाऊसाहेब बनकर (सर्व रा. कांचनवाडी, औरंगाबाद) यांचा समावेश आहे. पोलिस निरीक्षक मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास चालू आहे.

Web Title: married women suicide in well